मुंबई : पोस्ट ऑफिसमध्ये अशी एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला जवळपास ७ टक्क्यांहून अधिक पैसे मिळणार आहे. ही योजना सीनियर सिटीजनसाठी आहे. यावर ७.४ टक्के व्याज मिळणार आहे. या योजनेत नुसते रिटर्न्स चांगले मिळत नाही तर टॅक्समधून सूट देखील मिळते. ही योजना वयोवृद्धांसाठी आहे. तुमचं वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. याशिवाय ५५ ते ६० वय असणारेही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ज्यांनी व्हीआरएस घेतली आहे ते देखील एक महिन्यानंतर या योजनेत पैसे गुंतवू शकतात. अशा केसमध्ये ५० वर्ष पूर्ण झालेल्या लोकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. हे वाचा-Zero Cost Term Insurance: आता टर्म पॉलिसी बंद केल्यावर प्रीमियम मिळेल परत, वाचा आश्चर्यकारक फायदे या योजनेत तुम्ही एक हजार रुपयांपासून पैसे गुंतवू शकते. खातेधारक कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवू शकतो. याची मॅच्युरिटी ५ वर्ष असते. त्यानंतर ३ वर्षही पुढे वाढवता देखील येते. यामध्ये आयकर नियम ८० सी अंतर्गत टॅक्समधून १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. व्याज ५० हजारहून अधिक होत असेल तर तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागू शकतो. जर तुम्ही खात्यावर १५ लाख रुपये जमा केले तर ७.४ टक्के व्याजाच्या हिशोबानं तीन महिन्याला २५ हजार ७५० रुपये मिळतील. तर वर्षाला ही रक्कम १ लाख ११ हजार रुपये होईल. जॉईंट खातं उघडलं आणि त्यानुसार दोघांचे पैसे ठेवले तर तुमचे ३० लाख होतील. त्यावर डबल रक्कम म्हणजे २.२ लाख रुपये व्याज मिळेल.