JOIN US
मराठी बातम्या / मनी / पोस्ट ऑफिसची RD बंद झाली, पुन्हा सुरू करता येईल का? नेमकी काय प्रोसेस

पोस्ट ऑफिसची RD बंद झाली, पुन्हा सुरू करता येईल का? नेमकी काय प्रोसेस

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आरडी भरत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमची पोस्ट ऑफिस आरडी हप्ता न भरल्यामुळे बंद झाली असेल, तर काळजी करू नका.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : रिकरिंग डिपॉझिट (आरडी) म्हणजेच आवर्ती ठेव योजना हा बचतीचा एक चांगला मार्ग आहे. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठेही आरडी सुरू करता येते. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे आणि ही सर्वांत लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. ज्यामध्ये पाच वर्षं सतत पैसे जमा केल्यानंतर, तुम्हाला तुमचे एकूण जमा केलेले पैसे व्याजासह परत मिळतात. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 5.8% वार्षिक व्याजदर दिला जातोय. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आरडी भरत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमची पोस्ट ऑफिस आरडी हप्ता न भरल्यामुळे बंद झाली असेल, तर काळजी करू नका. तुम्ही तुमची आरडी सहजपणे पुन्हा सुरू करू शकता, फक्त त्यासाठी तुम्हाला काही पैसे दंड म्हणून भरावे लागतील. जर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटचा हप्ता शेवटच्या तारखेपर्यंत कोणत्याही कारणामुळे जमा करू शकत नसाल, तर तुम्हाला दरमहा 1% दराने दंडदेखील भरावा लागेल. तसंच सलग अनेक हप्ते न भरल्यास तुमचं अकाउंट बंद केलं जाऊ शकतं. जर तुमचंही अकाउंट हप्ते न भरल्यामुळे बंद झालं असेल, तर तुम्ही त्याच्या रिकव्हरीसाठी अर्ज करू शकता. पुन्हा अकाउंट सुरू झाल्यानंतर तुम्हाला आधी दंडासह मागील महिन्याचे थकित हप्ते भरावे लागतील. पण हे तुम्हाला दोन महिन्यांच्या आत करावं लागले, जर तुम्ही दोन महिन्यात कोणताही अर्ज केला नाही, तर तुमचं अकाउंट बंद केलं जातं.

आता पोस्टात जायची गरज नाही! पोस्टमनच देणार पैसे? नक्की काय आहे ही योजना

संबंधित बातम्या

तुम्ही अकाउंट महिन्याच्या 15 तारखेआधी उघडलं की नंतर यावर तुमच्या आरडी डिपॉझिटची तारीख ठरवली जाते. तुमचं अकाउंट कोणत्याही महिन्याच्या 15 तारखेपर्यंत उघडलं असल्यास, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत 15 तारखेपर्यंत हप्ते जमा करावे लागतील. तर, 15 तारखेनंतर अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही महिन्याच्या 16 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचा हप्ता जमा करू शकता. परंतु ठरलेल्या कालावधीत हप्ता न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो. कमी वयातही श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला, बस दर महिन्याला करा ‘हे’ काम मॅच्युरिटी कालावधी वाढवा एखादवेळी तुम्हाला वाटत असेल, की तुमची आर्थिक स्थिती थोडी चांगली नाही आणि तुम्हाला काही काळ सतत हप्ते भरणं कठीण जाणार आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या खात्याचा मॅच्युरिटी पिरिएड आणखी वाढवू शकता. पण हे काम तुम्हाला आधीच करावं लागेल. चार महिने हप्ते न भरल्यानंतर तुम्ही हे करू शकत नाही. जितके महिने तुम्ही हप्ता भरू शकणार नसाल, तितक्याच मुदतीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. आधीच भरा हप्ता तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही आरडीचे नंतरच्या महिन्यांचे पैसे आधीच भरू शकता. ज्यांना दर महिन्याला हप्ता भरायचा नसेल, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. पण त्यासाठी तुम्हाला किमान सहा महिन्यांचा अॅडव्हान्स हप्ता जमा करावा लागेल. 6 महिन्यांचे अॅडव्हान्स हप्ते जमा केल्यावर प्रत्येक 100 रुपयावर 10 रुपये आणि एक वर्षाचा हप्ता एकत्र जमा केल्यावर प्रत्येक 100 रुपयांवर 40 रुपये सूट दिली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या