नोटा बदलण्याविषयी पीएनबी बँकेच्या गाइडलाइन्स
मुंबई, 23 मे : आज 23 मे पासून बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे लक्षात घेऊन PNB ने आपल्या ग्राहकांसाठी नोटा बदलण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पीएनबीच्या ट्विटनुसार, जर तुम्ही तुमच्या 2000 च्या नोटा बदलण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेत गेलात तर तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची किंवा आयडी देण्याची गरज नाही.
19 मे रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जाऊन या नोटा जमा किंवा बदलून घेता येतील. 2000 रुपयांची नोट 30 सप्टेंबरपर्यंत चलनातील वैध असेल. लोक 2,000 रुपयांची नोट त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँका आणि RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांना भेट देऊन दुसरी नोट मिळवू शकतात. 2,000 रुपयांच्या नोटा कोणत्याही अडथळ्याशिवाय बँक खात्यात जमा करता येतील.
2000 Note : किती नोटा छापायच्या हे कोण ठरवतं, कुठे छापल्या जातात?आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणतीही व्यक्ती निर्धारित वेळेत कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोट बदलू शकते. पण एकावेळी फक्त 10 नोटा म्हणजेच 20,000 रुपयांच्या नोटा बदलता येतात.
2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही चार्ज घेतले जाणार नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क मागितल्यास तुम्ही तक्रार करू शकता. ज्यांचे बँक अकाउंट नाही ते देखील 2000 ची नोट बदलू शकतात. नोटा बदलून घेण्यासाठी बँक खाते आवश्यक नाही, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलेय.
2 हजारांच्या नोटा खपवण्यासाठी असाही ‘गोल्डन चान्स’, सराफ बाजारात गर्दीआरबीआयकडून बँकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यात वृद्ध आणि दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असं म्हटलंय. यासोबतच उष्णता लक्षात घेता नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी सावली आणि पाण्याची पूर्ण व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.