JOIN US
मराठी बातम्या / मनी / PM Awas Yojna | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

PM Awas Yojna | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

Pradhan Mantri Awas Yojana: घर खरेदी करण्यासाठी तुम्हालाही प्रधानमंत्री आवास योजनेतून (PMAY) अनुदान हवं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 नोव्हेंबर : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मदत करेल. यापूर्वी PMAY चा लाभ फक्त गरीब वर्गाला मिळत होता. आता गृहकर्जाची रक्कम वाढवून शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही PMAY च्या कक्षेत आणण्यात आले आहे. सुरुवातीच्या तरतुदींनुसार, PMAY मधील गृहकर्जाची रक्कम रु. 3 ते 6 लाखांपर्यंत होती, ज्यावर PMAY अंतर्गत व्याज अनुदान दिले जात होते. आता ती वाढवून आता 18 लाख रुपये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) च्या अर्जासाठीचे नियम जाणून घेऊया?

PMAY मध्ये किती सबसिडी मिळेल? 6.5 टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी फक्त 6 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर उपलब्ध आहे. वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमावणारे लोक 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 4 टक्के व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे वर्षाला 18 लाख रुपयांपर्यंत कमावणारे लोक 12 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3% व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतील. SBI Home Loan: सोप्या पद्धतीने मिळवा एसबीआयचे गृहकर्ज PMAY अंतर्गत सरकारी अनुदानाची रक्कम PMAY मध्ये, व्याज अनुदान हे व्याजाच्या रकमेतील (वास्तविक आणि मिळालेले अनुदान) फरक असणार नाही. हे व्याज अनुदानाच्या रकमेचे निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) असेल. वार्षिक उत्पन्नावर आधारित व्याज अनुदानाची रक्कम हे नऊ टक्के सवलतीच्या दराने मोजला जाईल. सबसिडीच्या NPV ची गणना करण्यासाठी, तुम्हाला कर्जाची परतफेड करायची असलेली रक्कम आणि प्रत्येक मासिक हप्त्यामध्ये व्याजाची रक्कम विचारात घेणे आवश्यक आहे. PMAY मधील अनुदानाची रक्कम तुमच्या कर्जाची रक्कम कमी करते आणि त्यामुळे तुमच्यावरील व्याजाचा बोजा कमी होतो. PMAY मध्ये व्याज अनुदानाची गणना कशी केली जाईल? कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे असे गृहीत धरू. (कमाल कर्जाची रक्कम रु. 6 लाख: सबसिडी: 6.5%) वास्तविक कर्जाची रक्कम: 6 लाख रुपये व्याज दर: 9 टक्के मासिक हप्ता: रु 5,398 20 वर्षात एकूण व्याज: 6.95 लाख रुपये 6.5 टक्के सबसिडीनुसार, तुमची व्याज सबसिडीनंतर NPV 2,67,000 रुपये असेल. सरकार हे व्याज अनुदान लोकांना देत आहे. त्यानुसार, तुमचे PMAY कर्ज 6 लाख रुपयांऐवजी 3.33 लाख रुपये होते. Home Loan: होम लोनविषयी जाणून घ्या सर्वकाही पीएमएवाय सबसिडीचा लाभ कसा मिळवायचा? सबसिडीबद्दल गृहकर्ज घेणाऱ्याशी बोला. तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज आधी सेंट्रल नोडल एजन्सीला पाठवला जाईल. मंजूर झाल्यास, एजन्सी अनुदानाची रक्कम कर्ज देणाऱ्या बँकेला देईल. ही रक्कम तुमच्या कर्ज खात्यात येईल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 7 लाख असेल आणि कर्जाची रक्कम 9 लाख असेल तर तुमची सबसिडी 2.35 लाख रुपये असेल. हे वजा केल्यावर तुमच्या कर्जाची रक्कम 6.65 लाख रुपये होईल. या रकमेवर तुम्ही मासिक हप्ता भराल. कर्जाची रक्कम तुमच्या सबसिडीच्या पात्रतेपेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला अतिरिक्त रकमेवर सामान्य दराने व्याज द्यावे लागेल. PMAY मध्ये कोणती खबरदारी घ्यावी? गृहकर्जावरील व्याजदर नऊ टक्क्यांपेक्षा वेगळाही असू शकतो. सध्या एमसीएलआरवर आधारित गृहकर्जाचे दर 8.5 टक्क्यांच्या जवळ आहेत. यामुळे, व्याज दर आणि मासिक हप्ता कमी असू शकतो. PMAY चा लाभ घेण्यासाठी पात्रता संबंधित समस्या तपासा. तुमच्या, जोडीदाराच्या किंवा मुलाच्या नावावर देशात कुठेही पक्के घर असेल तर PMAY चा लाभ घेता येणार नाही. Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदाने घटवले गृहकर्जावरील व्याजदर, वाचा सविस्तर PMAY: ऑनलाइन अर्ज कसा करावा? प्रधान मंत्री आवास योजनेच्या http://pmaymis.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा येथे मेनूमधील ‘Citizen Assessment’ वर क्लिक करा आणि अप्‍लाय श्रेणी निवडा. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तुम्ही तुमच्यानुसार पर्याय निवडा. यानंतर, तुम्हाला आधार क्रमांक भरावा लागेल आणि चेकवर क्लिक करावे लागेल. यानंतर एक ऑनलाइन फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका, व्हेरीफाय करा आणि सबमिट करा. सबमिशन केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज क्रमांक प्रदर्शित होईल. त्याची प्रिंट काढा आणि सेव्ह करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या