JOIN US
मराठी बातम्या / मनी / शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवी योजना; मिळणार आणखी 2 हजार रुपयांची मदत

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवी योजना; मिळणार आणखी 2 हजार रुपयांची मदत

‘पीएम किसान’ योजनेच्या नवव्या टप्प्याअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 9 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM KISAN) नवव्या टप्प्याचं अनावरण करतील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षाला सहा हजार रुपये मदत (Farmer Financial Support) दिली जाते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. आतापर्यंत या योजनेमधून आठ टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. आज याचा नववा टप्पा (PM KISAN 9th Installment) पार पडणार आहे. या प्रत्येक टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले आहेत. किसान सन्मान निधी पोर्टलवर लाभार्थींची यादी (Beneficiaries list) तयार करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारची असते. एखाद्या शेतकऱ्याने यासाठी अर्ज (PM KISAN Application) दाखल केल्यावर, कागदपत्रांची पडताळणी केली जाते. जमीनीसंबंधी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या शेतकऱ्याचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत (PM KISAN scheme) नोंदवले जाते. यानंतर त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये किसान सन्मान निधीची रक्कम जमा होते. तुमचं नाव या लाभार्थींच्या यादीत आहे की नाही याची तपासणी तुम्ही स्वतःच करु शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmkisan.gov.in) जावं लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर बेनिफिशिअरीज लिस्ट (Beneficiaries List) हा पर्याय निवडा. यानंतर राज्यांच्या नावांची यादी समोर येईल. यातून तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव तुम्ही निवडू शकता. गावाची निवड केल्यानंतर गेट रिपोर्ट (Get Report) या पर्यायावर क्लिक करा, ज्यानंतर तुम्हाला गावातील सर्व लाभार्थ्यांची (Beneficiaries of PM KISAN) यादी दिसेल. यात तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. तुमच्या कामाची बातमी! दररोज 416 रुपयांची गुंतवणूक करुन मिळवू शकता 1 कोटी, जाणून घ्या डिटेल्स केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली होती. या योजने अंतर्गत सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर वर्षी 2000 रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये मदत देते. याचा पहिला टप्पा एक डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान जमा होतो. दुसरा टप्पा 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान जमा होतो. तर तिसरा टप्पा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान जमा होतो. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या