मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांशी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेतील आज 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना आज दिवाळीआधी आनंदाची बातमी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी आज 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांना 12 वा हप्ता म्हणून दिले जातील. यावेळी हा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली आहे. सुमारे साडेचार महिन्यांपूर्वी म्हणजे 31 मे रोजी शेतकरी 11 वा हप्ता मिळाला होता. या आधी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. यावेळी 12 व्या हप्त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान संमेलनाचं उद्घाटन देखील करणार आहे. पंतप्रधान डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय ‘पीएम किसान सन्मान संमेलन 2022 ‘चं उद्घाटन होणार आहे.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास का होतोय उशीर, कारण आलं समोरयांना मिळणार नाही लाभ 12 व्या हप्त्याआधी KYC न करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही असं आधीच सरकारकडून सांगण्यात आलं होतं. ज्यांना 31 मे रोजी पैसे जमा झाले नाहीत त्यांना 17 ऑक्टोबर रोजीी 4000 तर उर्वरित शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार आहेत. ज्यांनी KYC केलं नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार?कसं चेक करायचं? सगळ्यात आधी PM Kisan च्या वेबसाइटला भेट द्या. pmkisan.gov.in/ या साइटला भेट द्यायची आहे. ‘Farmers Corner’ हा पर्याय निवडायचा आहे. तिथे गेल्यावर ‘Beneficiary Status’ हा पर्याय दिसेल तिथे क्लीक करा. नवीन पेज सुरू होईल तिथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि OTP द्या. तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही ते दिसेल. तिथे तुम्ही Get Data पर्याय निवडा. तुमच्या खात्यावर आतापर्यंत जमा झालेले सगळे पैसे आणि इतर बँकेत झालेली ट्रॅन्झाक्शन हिस्ट्री तुम्हाला दिसणार आहे.