नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: कोरोना काळात (Coronavirus) अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. मात्र येणाऱ्या काळात अशा अनेकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. मोबाइल हँडसेट बनवणाऱ्या कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत जवळपास 50 हजार जणांना नोकरीची संधी देऊ शकतात. सरकार येणाऱ्या काळात प्रोडक्शन-लिंक्ड इनसेंटिव्ह (PLI) स्कीमअंतर्गत देशातील आणि परदेशातील कंपन्यांना त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स भारतात सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, या मोबाइल कंपन्यांमध्ये जवळपास 50 हजार जणांसाठी हा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. देशभरात लॉकडाऊनमुळे मोबाइल कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी सध्या बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. PLI स्कीमचा मिळेल फायदा इंडिया सेल्यूलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (IIA) चे प्रेसिंडेंट पंकज मोहिंद्रू यांच्या मते आतापासून पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत मोबाइल हँडसेट कंपन्या 50000 कर्मचाऱ्यांची भरती करतील. लॉकडाऊनची सुरुवात झाल्यानंतर अनेक फॅक्टरीजमधील कर्मचारी त्यांच्या घरी परतले आहे. आता हे कामगार पुन्हा नोकरीच्या शोधात मोठ्या शहरात परतत आहेत. या दरम्यान सरकारने PLI स्कीम आणली आहे. या कंपन्यांमध्ये असेल नोकरीची संधी इकॉनॉमिक टाइम्समधील बातमीनुसार डिक्शन टेक्नोलॉजीज, यूटीएल नियोलिंक्स, लावा इंटरनॅशनल, ऑप्टीमस इलेक्ट्रॉनिक्स आणि माइक्रोमॅक्स मध्ये डिसेंबर अखेर पर्यंत 20000 नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. गेल्या वर्षी मोबाइल कंपन्यांमध्ये कमी प्रमाणात नोकरभरती झाली होती. पंकज मोहिंद्रू यांच्या मते गेल्या वर्षी PLI योजना नसल्यामुळे देखील कमी नोकरभरती झाली होती. या वर्षी सरकारने ही योजना आणल्यामुळे अनेकांना फायदा होणार आहे. (हे वाचा- LVB च्या ग्राहकांना दिलासा! ठेवीदारांची परतफेड करण्याइतकी रक्कम बँकेकडे उपलब्ध) मोहिंद्रू यांनी अशी माहिती दिली आहे की, यावेळी हँडसेट सेक्टरमध्ये जवळपास सात लाख कर्मचारी काम करत आहेत. गेल्यावर्षी या सेक्टरमध्ये 15 हजार नोकरभरती करण्यात आली होती. पीएलआय स्कीम व्यतिरिक्त सरकारने मोबाइल कंपन्यांच्या जवळपास 10 अर्जांना मंजूरी दिली आहे. यामध्ये सॅमसंग, फॉक्सकॉनची होनहई आणि रायझिंग स्टार, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन यासारख्या पाच विदेशी कंपन्यांचा समावेश आहे. यांना पीएलआय स्कीम अंतर्गत एकूण 41,000 कोटी रुपयांचे इन्सेटिव्हचा फायदा मिळेल, पाच वर्षांदरम्यान हा फायदा मिळेल.