नवी दिल्ली, 30 डिसेंबर: गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) च्या किंमतींबाबत एक बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यामध्ये अशी माहिती समोर आली होती सध्या दर महिन्याला बदलणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती दर आठवड्याला बदलणार आहेत. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही आहे. कंपन्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यामध्ये समोर आली होती. या नव्या प्रणालीमुळे कंपन्याना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा यातून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान PIB फॅक्ट चेकने हा दावा फेटाळला आहे. सरकारी कंपन्या असा कोणताही विचार करत नाही आहे. पीआयबी फॅक्टने ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे आता गॅसच्या किंमती दर आठवड्याला बदलणार का याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (हे वाचा- IT रिटर्न भरताना कशाप्रकारे कराल ई-व्हेरिफिकेशन? वाचा सविस्तर )
पीआयबी फॅक्ट चेक काय काम करते? PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. (हे वाचा- 1 जानेवारीपासून जीवन विमा होणार ‘सरल’, वाचा या पॉलिसीबाबत 5 महत्त्वाचे मुद्दे ) कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता