नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : सरकारी तेल कंपन्यांनी आज एक दिवसानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Hike) दरात वाढ केली आहे. देशातील जवळपास सर्व शहरांत आज पेट्रोल दरात जवळपास 25 पैसे प्रति लीटर, तर डिझेल दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईन कॉर्पोरेशननुसार (IOCL), दिल्लीत पेट्रोल 101.64 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल दर 107.47 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जवळपास 22 दिवसांनंतर मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी पेट्रोल दरात वाढ (Petrol price hike) केली होती. तर सलग चौथ्या दिवशी डिझेल किंमतीतही वाढ करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोल दरात 20 पैसे वाढ करण्यात आल्यानंतर आज पुन्हा 30 सप्टेंबर रोजी पेट्रोल 25 पैसे प्रति लीटरने महागलं आहे.
डिझेल दरात 5 वेळा वाढ - देशभरात मागील 4 दिवसांत डिझेल दरात 4 वेळा वाढ झाली आहे. या चार दिवसांत डिझेल 95 पैसे प्रति लीटरने महागलं. भारतीय तेल कंपन्यांनी 24 सप्टेंबर रोजी 20 पैसे, तर 26 सप्टेंबरला 25 पैसे वाढ केली होती. 27 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ झाली. त्यानंतर 28 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा 30 सप्टेंबर रोजी डिझेल दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. » दिल्लीत पेट्रोल 101.64 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर » मुंबईमध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 97.52 रुपये प्रति लीटर » चेन्नईत पेट्रोल 99.36 रुपये आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लीटर » कोलकातामध्ये पेट्रोल 102.17 रुपये आणि डिझेल 92.97 रुपये प्रति लीटर
आणखी वाढू शकतो पेट्रोल-डिझेल दर - आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती तीन वर्षांत पहिल्यांदा 80 डॉलर प्रति बॅरल जवळपास पोहोचू शकतात. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू शकतात.