JOIN US
मराठी बातम्या / मनी / नव्याने नोकरीला लागलेल्या तरुणांनी कशी करावी बचत? वापरा या सोप्या टिप्स

नव्याने नोकरीला लागलेल्या तरुणांनी कशी करावी बचत? वापरा या सोप्या टिप्स

मौज-मजेसोबत पैसे साठवण्याचं खास नियोजन केलं तर पुढे जाऊन आपल्याला जास्त त्रास होत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : बऱ्याचदा आपण नव्याने नोकरीला लागलो की आपल्याला असं वाटतं की आपल्या हातात येणारा पैसे हा आपण स्वत:साठी खर्च करायला हवा. आपण येणारा पगार उत्साहात सगळा खर्चही करून टाकतो. पण पहिली काही वर्ष ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात. मौज-मजेसोबत पैसे साठवण्याचं खास नियोजन केलं तर पुढे जाऊन आपल्याला जास्त त्रास होत नाही. तरुण वयातही तुम्ही श्रीमंत होऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्ही तुमच्या पगारातील जवळपास अर्धी रक्कम ही बाजूला काढून ठेवायला शिकलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात केली तरीही तुमच्याकडे भरपूर पैसे साठून राहतील. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ते उगाच नाही. कोणत्या गोष्टी कराव्यात? सर्वात पहिलं म्हणजे खर्चासाठी वही घालावी. तुमचे होणारे खर्च हे रोज लिहून ठेवले तर आपल्यालाच कळतं आपले खर्च कुठे कमी होतात आणि कुठे जास्त होतात. पुढच्या महिन्यासाठी खर्चाचा ताळमेळ बसवणं अगदी सोपं जातं. आपल्या पगाराचे तीन भाग करावेत. पहिला भाग हा आपल्या गरजांसाठी दुसरा भाग हा अत्यावश्यक किंवा इमरजन्सी फंड म्हणतो तसा आणि तिसरा भाग हा आपल्या सेव्हिंगचा असायला हवा.

EPFO updates : तुमचा UAN नंबर कशा शोधायचा, तो Activate कसा करायचा?

यमुना धुपकर (नाव बदललं आहे) म्हणतात, मी एक गृहिणी आहे. कमी खर्चातही उत्तम घर चालवण्याचं कौशल्य गृहिणीकडे असतं असं मला वाटतं. मी माझे सगळे खर्च लिहून ठेवते. तुम्ही खर्च लिहून ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठे पैसे जातात आणि किती वायफळ खर्च होतात याचे ताळमेळ घालणं कठीण होतं. त्यामुळे नेहमी त्यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. मी माझ्या लग्नापासून आजपर्यंत प्रत्येक खर्च लिहून ठेवले आहेत. त्यामुळे मला पुढच्या महिन्यात कोणते खर्च टाळायचे किंवा अति खर्च कुठे होतात यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे ठरवता येतं. कशी करायची गुंतवणूक? तुम्ही बँकेत RD उघडू शकता तिथे तुम्ही तुमचे इमर्जन्सी फंड ठेवू शकता. डिजिटल RD ही उघडता येते तशी आवश्यक असेल तेव्हा मोडता येते. त्यामुळे तुम्ही याचा आधार घेऊ शकता. दुसऱ्या सेव्हिंग खात्यामध्ये तुम्ही ठरावीक रक्कम इमरजन्सीसाठी बाजूला ठेवू शकता. ही रक्कम अशी असायला हवी जी गरजेला पटकन तुमच्या कामी येईल. ती तुम्ही तुमच्या मौज मजेसाठी वापणार नाही. एकदाच एकदम कपडे किंवा शूज या सगळ्या गोष्टी घेण्यापेक्षा महिन्याला थोडे पैसे हे स्वत:साठी खर्च करावेत. दोन महिन्यातूनही एकदा तुम्ही छोटी छोटी एक वस्तू घेऊ शकता. त्यामुळे एकदम खर्च होणार नाहीत. एकदा आवडलेली वस्तू झटक्यात घेणं चुकीचं आहे. ती किमान दोन ते तीन वेळा पाहिल्यावर तुम्हाला आवडली तरच खरेदी करण्यावर भर द्या.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी, लवकरच सुरू होणार ‘ही’ सेवा

संबंधित बातम्या

हे पर्यायही गुंतवणुकीसाठी उत्तम तुम्ही PPF खात्यामध्ये पैसे गुंतवू शकता. तरुणांनी तर थोडी थोडी रक्कम पुढच्या २० वर्षांसाठी साठवलीी तरी खूप मोठी गुंतवणूक होते. अगदी १००० रुपयांपासून सुरुवात करता येते. नोकरीला लागताच क्रेडिट कार्ड वापरणं टाळा. यामुळे तुम्ही वाटेल तसे खर्च करता. खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

तुमच्या स्कील्सवर खर्च करा. ती तुमची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्याचा फायदा तुम्हाला कामाच्या ठिकाणी होऊ शकतो. स्वतःची तब्बेत चांगली राहावी यासाठी व्यायाम करावा त्याने तुमचे आजारी पडून होणारे खर्च वाचतील. बायको किंवा आईला भेटवस्तू देताना शक्यतो सोन्याचं काही तरी द्यावे. त्याने बचत आणि भेट दोन्ही साध्य होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या