JOIN US
मराठी बातम्या / मनी / Tata च्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई, दोन वर्षात 2 रुपयांचा शेअर 175 रुपयांवर

Tata च्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई, दोन वर्षात 2 रुपयांचा शेअर 175 रुपयांवर

Multibagger Share: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर गेल्या दोन वर्षांत, TTML शेअरची किंमत 2 रुपयांवरून 175 रुपयांपर्यंत वाढली आहे, जी सुमारे 87.50 पट म्हणजे 8650 टक्के आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 एप्रिल : शेअर एखादा चांगला स्टॉक गुंतवणूकदाराचं नशीब बदलू शकतो. अनेक शेअर्सही हे दाखवून दिलं आहे. त्यात पेनी तर कमी वेळेत जास्त परतावा देण्याची क्षमता ठेवतात. मात्र यात जोखीमही मोठी असते. असाच एक टाटा समूहाचा शेअर आहे ज्याने गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड म्हणजेच TTML या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर गेल्या दोन वर्षांत, TTML शेअरची किंमत 2 रुपयांवरून 175 रुपयांपर्यंत वाढली आहे, जी सुमारे 87.50 पट म्हणजे 8650 टक्के आहे. TTML स्टॉकची प्राईज हिस्ट्री गेल्या एका महिन्यात या मल्टीबॅगर शेअरची किंमत 113 रुपयांवरून 175 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कालावधीत टीटीएमएलचा स्टॉक सुमारे 55 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक सुमारे 39 रुपयांवरून 175 रुपयांपर्यंत वाढला आहे. स्टॉकमधील ही वाढ 350 टक्के आहे. गेल्या एका वर्षात टाटा समूहाच्या या शेअरची किंमत 13.45 रुपयांवरून 175 रुपयांपर्यंत वाढली आहे. टाटा समूहाचा हा शेअर या कालावधीत सुमारे 1200 टक्क्यांनी वाढला आहे. भारताकडून संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत; उपाशी झोपणाऱ्या नागरिकांना मिळेल दिलासा तर गेल्या दोन वर्षांत हा टीटीएमएल मल्टीबॅगर पेनी स्टॉक 2 रुपयांवरून 175 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 8650 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Aadhaar Card शी लिंक असलेला मोबाईल नंबर आठवत नाही? पटकन चेक करा डिटेल्स TTML स्टॉक रिटर्न TTML स्टॉकच्या परताव्यावर नजर टाकली तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 4.50 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 13 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 87.50 लाख झाले असते. TTML शेअरचे सध्याचे बाजार भांडवल 34,211 कोटी आहे. TTML शेअरचा 52 वीक हाय 290.15 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या