JOIN US
मराठी बातम्या / मनी / ₹6 चा हा स्टॉक 150 रुपयांवर! गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे एका वर्षात झाले 24 लाख

₹6 चा हा स्टॉक 150 रुपयांवर! गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे एका वर्षात झाले 24 लाख

गुंतवणुकीसाठी (Investment in Share Market) अनेक गुंतवणूकदारांचा (Investors) कल शेअर बाजाराकडे (Share Market Latest Update) असतो. शेअर बाजारात मोठ्या संख्येने कंपन्या समाविष्ट आहेत.

जाहिरात

कपिल सिब्बल हे देशातील अशा काही नेत्यांपैकी एक आहेत ज्यांची संपत्ती 100 कोटींहून अधिक आहे. 2016 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य 212 कोटी रुपये आहे. यामध्ये सुमारे 14 कोटी रुपयांच्या ठेवी बँक खात्यात आहेत. तसंच, त्यांच्याकडे एकूण 3 लाख रुपये रोख रक्कम आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: गुंतवणुकीसाठी (Investment in Share Market) अनेक गुंतवणूकदारांचा (Investors) कल शेअर बाजाराकडे (Share Market Latest Update) असतो. शेअर बाजारात मोठ्या संख्येने कंपन्या समाविष्ट आहेत. मात्र, शेअर बाजारात असे काही स्वस्त स्टॉक (Stocks) आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीतच चांगले रिटर्न दिले आहेत. ब्राईटकॉम ग्रुपचा (Brightcom Group) शेअर हा त्यापैकीच एक होय. ही कंपनी अनेक देशांमध्ये व्यवसाय करते. एअरटेल, व्होडाफोन, टायटन, ब्रिटिश एअरवेजसारख्या अनेक मोठ्या कंपन्या ब्राईटकॉम ग्रुपच्या ग्राहकांच्या यादीत समाविष्ट आहेत. शेअर बाजारात बरेच स्वस्त स्टॉक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. त्यांना पेनी स्टॉक (Penny Stocks) असं म्हणतात. या स्टॉक अर्थात समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मल्टिबॅगर रिटर्न (Multibagger Return) दिला आहे. ब्राइट कॉम ग्रुपचा शेअर त्यापैकीच एक होय. ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स गेल्या एक वर्षात तेजीत असून त्यांची किंमत 2320 टक्क्यांनी वाढली आहे. 12 फेब्रुवारी 2021 रोजी हा स्टॉक ‘बीएसई’वर 6.17 रुपयांवर बंद झाला होता. जो काल ‘बीएसई’वर (BSE) 150.10 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. हे वाचा- Paytm च्या शेअर नीच्चांकी पातळीवर, विजय शेखर शर्मांच्या संपत्तीत मोठी घट एक लाखाचे झाले 24 लाख जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी ब्राइट कॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या एक लाखाचे 24.23 लाख रुपये झाले असते. स्टॉकने 24 डिसेंबर 2021 रोजी 52 आठवड्यांचा उच्चांक 204.80 रुपये आणि 5 मे 2021 रोजी 52 आठवड्यांचा नीचांकी 5.82 रुपये स्तर गाठला. कंपनीच्या एकूण 3.27 लाख शेअर्सची `बीएसई`वर 4.90 कोटी रुपयांची उलाढाल आहे. ‘बीएसई’वर फर्मचे मार्केट कॅप 15,608 कोटी रुपये होता. तथापि, या वर्षाच्या सुरुवातीपासून स्टॉकमध्ये 16.31 टक्क्यांची घट झाली आहे. 25 जानेवारी 2022 रोजी संपलेल्या कालावधीच्या शेवटी 15 प्रमोटर्सचा या फर्ममध्ये 19.74 टक्के हिस्सा होता. तसेच सार्वजनिक शेअर होल्डरकडे 80.26 टक्के हिस्सा होता. हे वाचा- Rakesh Jhunjhunwala यांना 10 मिनिटात 186 कोटींचा नफा, टाटाच्या दोन शेअर्सची कमाल कंपनी नेमकं काय करते? ब्राइटकॉम ग्रुप ही एक डिजिटल मार्केटिंग कंपनी (Digital Market Company) आहे. ही कंपनी जगातील अनेक देशांमध्ये अ‍ॅड-टेक, न्यू मीडिया आणि आयओटीवर आधारित व्यवसायांमध्ये आहे. ही कंपनी अमेरिका, इस्त्रायल, लॅटिन अमेरिका एमई, पश्चिम युरोप आणि आशिया पॅसिफिक या प्रदेशात व्यवसाय करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत एअरटेल, ब्रिटिश एअरवेज, कोका-कोला, ह्युंदाई मोटार्स, आयसीआयसीआय बॅंक, आयटीसी, एलआयसी, मारुती सुझुकी, एमटीव्ही, पी अ‍ॅण्ड जी कतार एअरवेज, सॅमसंग, व्हायकॉम, सोनी, स्टार इंडिया, व्होडाफोन, टायटन सारख्या मोठ्या जाहिरातदारांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या