JOIN US
मराठी बातम्या / मनी / Stock : बाबा रामदेव यांच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, 3 वर्षात 4 वेळा कमाई

Stock : बाबा रामदेव यांच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, 3 वर्षात 4 वेळा कमाई

पतंजली फूड्सचा शेअर हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. अवघ्या ३ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 5 रुपये डिव्हिडंट देण्याची घोषणा केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : पतंजली फूड्सचा शेअर हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. अवघ्या ३ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 5 रुपये डिव्हिडंट देण्याची घोषणा केली. याची तारीख 26 सप्टेंबर निश्चित केली आहे. नुकतेच बाबा रामदेव यांनी पतंजली समूह आगामी काळात 4 IPO लाँच करणार असल्याची घोषणा केली. पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये गेल्या 3 महिन्यांत 38 टक्क्यांनी वाढ झाली. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 46% परतावा दिला आहे. २०२२ या वर्षात स्टॉकने गुंतवणूकदारांना 56 टक्के नफा दिला आहे. त्याने एका वर्षात गुंतवणूकदारांना 26 टक्के रिटर्न दिला आहे आणि 3 वर्षात गुंतवणूकदारांना 39,250 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. त्यामुळे सध्या पतंजलीची चर्चा सगळीकडे होत आहे. जवळपास ३ वर्षात पतंजलीने चौपट रिटर्न दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पतंजलीमध्ये गुंतवणूक करणारे तीन वर्षात श्रीमंत झाले आहेत. ज्यांनी तीन वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले आजच्या घडीला त्याची किंमत तीन लाख ९९ हजार ७१७ रुपये एवढी झाली आहे. ज्यांनी एक वर्षापूर्वी १ लाख रुपये गुंतवले त्याची आज किंमत १ लाख २६ हजार झाली आहे. हे वाचा-Multibagger Stock: या शेअरमुळे गुंतवणूकदारांना वर्षभरात चार पट परतावा, तुमच्याकडे आहे का हा शेअर? पतंजली फूड्स लिमिटेडचा स्टॉकमध्ये चांगलीच तेजी आल्याचं पाहायला मिळालं. गेल्या आठवड्यात 1,415 रुपयांवर पोहोचले. हा 52 आठवड्यांमधील उच्चांक मानला जात आहे. पतंजलीच्या मार्केट कॅपने एकदा 50 हजार कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे. गेल्या आठवड्यात बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषदेत पतंजलीचा व्यवसाय येत्या पाच ते सात वर्षांत अडीच पटीने वाढून एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असं सांगितलं होतं. हे वाचा-पतंजली म्हटलं की बाबा रामदेवच समोर येतात, पण खरे मालक कोण आहेत? अनेकांचा अंदाज चुकला ५ वर्षात ४ नवे आयपीओ आणण्याच्या तयारीत पतंजली आहे असंही रामदेव बाबा यांनी सांगितलं. त्यामुळे पतंजली सध्या त्यावर काम करत आहे. यामध्ये पतंजलि आयुर्वेद, पतंजलि मेडिसिन, पतंजलि लाइफस्टाइल, पतंजलि वेलनेस यांचा समावेश असणार आहे. पतंजलीच्या वाढत्या स्टॉकचा फायदा ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना मोठा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या