JOIN US
मराठी बातम्या / मनी / PAN Card संबंधित एक चूक आणि भरावा लागेल 10 हजार रुपयांचा दंड, आजच करुन घ्या चेक

PAN Card संबंधित एक चूक आणि भरावा लागेल 10 हजार रुपयांचा दंड, आजच करुन घ्या चेक

PAN Card: पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. सध्याच्या काळात आर्थिक व्यवहारांसाठी हे आवश्यक मानलं जातं. यासंबंधीत एक चूकही तुम्हाला महागात पडू शकते. चला तर मग जाणून घेऊया हे टाळण्यासाठी काय करावं.

जाहिरात

पॅन कार्ड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

PAN Card: पॅन किंवा परमानेंट अकाउंट नंबर हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक आयडी आहे. जो भारतीयांसाठी एक महत्त्वाचे कायदेशीर ओळखपत्र आहे. आयकर विभागासाठी हे तुमचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे, परंतु तुमच्याकडे फक्त एकच पॅन कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन पॅन कार्ड ठेवण्याची परवानगी नाही. तुम्हाला दोन पॅनकार्डसह पकडले तर, आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो.

एकापेक्षा जास्त पॅन असल्यास काय? आयकर विभागाच्या नियमांनुसार, तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दोन पॅन कार्ड कसंकाय होतात? दोन पॅन कार्ड असण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की- 1.अनेक अ‍ॅप्लीकेशन तुम्ही पॅनसाठी अर्ज केला आणि नंतर तो वेळेवर पोहोचला नाही, मग तुम्ही पुन्हा अर्ज केला. यामुळे दोन-दोन पॅनकार्ड तयार होतात. 2.पॅनकार्डमध्ये चूक असल्यास तुमच्या पॅनमध्ये चूक झाली असेल आणि ती सुधारण्याऐवजी तुम्ही नवीनसाठी अर्ज केला होता. 3.लग्नानंतर नवीन पॅन तयार केले: लग्नानंतर महिला अनेकदा त्यांचे आडनाव बदलतात, त्यानंतर ते त्यांच्या पॅनमध्येही बदलावे लागते. या प्रकरणात दोन कार्ड असू शकतात. 4.फ्रॉडमुळे काही लोक फसवणुकीसाठी अनेक पॅनकार्ड सोबत ठेवतात, जे बेकायदेशीर आहेत. पॅन सरेंडर कसे करावे? तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने पॅन सरेंडर करण्यासाठी अर्ज करू शकता. Aadhar Pan Link : ना सरकारी योजनेचा लाभ ना मिळणार लोन? 30 जून आधी करावं लागणार हे महत्त्वाचं काम ऑनलाइन सरेंडर कसे करावे? तुम्हाला पॅन बदलण्याची रिक्वेस्ट अॅप्लीकेशन फॉर्म भरावा लागेल. ज्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला तुम्ही वापरत असलेला पॅन क्रमांक टाकावा लागेल. आयटम क्र. 11 मध्ये, तुम्हाला दुसऱ्या पॅनचे डिटेल्स द्यावे लागतील. त्याची एक कॉपी देखील अटॅच करावी लागेल आणि नंतर NSDL वेबसाइटला भेट देऊन सबमिट करावं लागेल. Pan Card वर असलेल्या प्रत्येक नंबरमध्ये दडलाय गूढ अर्थ, तुम्हाला माहिती आहे का? ऑफलाइन सरेंडर कसं करायचं तुम्हाला फॉर्म 49A भरावा लागेल. फॉर्ममध्ये सरेंडर करण्यासाठी पॅन कार्डचे डिटेल्स भरा आणि हा फॉर्म तुमच्या जवळच्या UTI किंवा NSDL TIN सुविधा केंद्रात सबमिट करा. त्याची एकनॉलेजमेंट पावती अवश्य ठेवा. तुमच्या अधिकारक्षेत्रातील असेसिंग ऑफिसरला पत्र लिहा. आयकर विभागाच्या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या क्षेत्राचा ज्यूरिडिक्शन ऑफिसर कोण आहे हे शोधू शकता. या पत्रात तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर टाकलेली सर्व माहिती द्यावी लागेल. सरेंडर केल्या जाणाऱ्या डुप्लिकेट पॅनकार्डचे डिटेल्सही द्यावे लागतील. तुम्हाला डुप्लिकेट कार्डची कॉपी आणि NSDL TIN कडून मिळालेली एकनॉलेजमेंट पावतीही यामध्ये अटेस्ट करावी लागेल आणि जमा करावी लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या