JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता दंड भरून पॅन-आधार कार्ड करावे लागेल लिंक; या मुदतीनंतर पॅन कार्ड थेट अवैध ठरणार

आता दंड भरून पॅन-आधार कार्ड करावे लागेल लिंक; या मुदतीनंतर पॅन कार्ड थेट अवैध ठरणार

प्राप्तिकर विभागानं सशुल्क पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. या मुदतीत आधार कार्डला लिंक नसलेलं पॅन कार्ड अवैध मानलं जाईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : आपण एखाद्या बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी गेलो की, आपल्याकडे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी केली जाते. या दोन गोष्टी अनेक शासकीय कामांसाठी वापरता येतात. त्यावरून आपलं वय, पत्ता यासारखी माहिती समजण्यास मदत होते. काही दिवसांपूर्वी शासनानं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अजूनही अनेक नागरिकांनी ते लिंक केलेलं नाही. असे नागरिक आता दंड भरून आपलं पॅन कार्ड आधारला लिंक करू शकतात. प्राप्तिकर विभागानं सशुल्क पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. 31 मार्च 2023 नंतर आधार कार्डला लिंक नसलेलं पॅन कार्ड अवैध मानलं जाईल. झी बिझनेसनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आयकर विभागानं सांगितल्यानुसार, 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक आहे. त्यापूर्वी, नागरिकांनी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी. 31 मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पॅन कार्ड अवैध मानलं जाईल. याचा अर्थ कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. सशुल्क लिंकिंग सुरू 1 जुलैपासून एक हजार रुपये दंड भरून पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची सुविधा दिली जात आहे. पुढील 9 महिन्यांसाठी म्हणजे मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवली जाणार आहे. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक नसल्यास ते अवैध म्हणून घोषित केलं जाईल. पॅन होईल अवैध नियमांनुसार, तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक न केल्यास, इन्कम टॅक्स अॅक्ट कलम-139एए अंतर्गत तुमचं पॅन अवैध होईल. तज्ज्ञांच्या मते, पॅन कार्ड आधारला लिंक नसेल तर ऑनलाइन आयटीआर भरण्यात अडचणी येतील. जुने रखडलेलं रिफंडही अडकतील. याशिवाय, आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन वापरता येणार नाही. अवैध पॅन कार्ड वापरल्यास होणार दंड पॅन कार्ड रद्द केल्यानंतर म्हणजेच अवैध ठरल्यानंतर ते पुन्हा सुरू करता येऊ शकतं. मात्र, यादरम्यान जर कोणी रद्द केलेले पॅनकार्ड वापरले, तर ते इन्कम टॅक्स अॅक्टमधील कलम 272बीचं उल्लंघन मानलं जाईल. अशा पॅनधारकाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. रद्द केलेलं पॅनकार्ड पुन्हा वापरल्यास दंडाची रक्कमही वाढू शकते. अशा पद्धतीने करा ऑनलाइन PAN-Aadhaar लिंक 1) जर तुमचं अकाउंट तयार झालेलं नसेल तर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करा. 2)आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फाइलिंग बेवसाईटवर जा. 3)वेबसाईटवर ‘लिंक आधार’ ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. 4)लॉगइन केल्यानंतर तुमच्या अकाउंटच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. 5)प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल. तो सिलेक्ट करा. तिथे दिलेल्या सेक्शनमध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. 6) सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या ‘लिंक आधार’ ऑप्शनवक क्लिक करा. त्यानंतर तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल. हे वाचा -  CNG आणि PNG चे दर कमी होणार? सरकार लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत पॅन-आधार लिंक करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा 1) ई-फायलिंग पोर्टलद्वारे अल्फान्यूमेरिक परमनंट अकाउंट नंबर 12 अंकी आधार क्रमांकाशी ऑनलाइन लिंक करणं सोपं आहे. दोन्ही लिंक करण्यासाठी, तुम्ही UIDPAN12 अंकी आधार क्रमांक> 10अंकीPAN क्रमांक> 567678 किंवा 56161 वर एसएमएस देखील पाठवू शकता. 2) ज्या नागरिकांना पॅन-आधार ऑनलाइन लिंक करण्यात अडचणी येत आहेत ते NSDL आणि UTITSL च्या पॅन सेवा केंद्रांवरून ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. 3) जर तुम्ही मुदतीच्या आत पॅन-आधार लिंक केलं नसेल, तर इन्कम टॅक विभाग तुमचं पॅन ‘अवैध’ करेल. याचा अर्थ असा की तुम्ही यापुढे आयटीआर किंवा बँक खाती उघडण्यासाठी व इतर आवश्यक कामांसाठी पॅन कार्ड वापर करू शकत नाहीत. हे वाचा -  सरकारी 2 बँका देत आहेत सर्वोत्तम रिटर्न, फक्त ‘या’ योजनेत गुंतवा पैसे 4) इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961च्या कलम 272B अंतर्गत, अवैध पॅन वापरल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाईल. पॅन कार्डची माहिती भरताना विशेष काळजी घ्या. 10 अंकी पॅन क्रमांक अतिशय काळजीपूर्वक भरा. यामध्ये झालेल्या चूकीमुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकता. जक तुमच्याकडे दोन पॅन कार्ड आढळली तरी तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. 5) आधारशी पॅन लिंक करण्याची अट अनिवासी भारतीयांना लागू होत नाही. पण, एनआरआय व्यक्तीला आर्थिक व्यवहार करण्यासाठी आधार कार्डची आवश्यक भासू शकते. त्यासाठी अर्ज करण्यास असे नागरिक पात्र आहेत. जर, एनआरआयकडे आधार कार्ड असेल तर ते पॅनशी लिंक करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या