JOIN US
मराठी बातम्या / मनी / Pan-Aadhar लिंक करण्याची आज अखेरची संधी! सरकार डेडलाइन वाढवणार का?

Pan-Aadhar लिंक करण्याची आज अखेरची संधी! सरकार डेडलाइन वाढवणार का?

PAN-Aadhaar Linking: तुम्ही अजुनही पॅन आधार लिंक केलं नसेल तर आज अखेरची संधी आहे. यानंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि तुम्ही त्यावरुन कोणतंही काम करु शकणार नाहीत.

जाहिरात

आधार पॅन लिंक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

PAN-Aadhaar Linking Last Date: पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची संधी आज संपणार आहे. म्हणजेच जर तुम्ही 30 जून 2023 पर्यंत म्हणजेच आजच्या तारखेपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर तुमच्या पॅन कार्डचा काही उपयोग होणार नाही. हा डॉक्यूमेंट पूर्णपणे निरुपयोगी होईल. तुम्हाला कुठेही पॅन कार्ड वापरता येणार नाही. तसेच अनेक सुविधांचा लाभ घेता येणार नाही. पण जर तुम्ही आधीच आधार आणि पॅन लिंक केले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. तुम्ही आज तुमचा पॅन आणि आधार लिंक करणार असाल तर तुम्हाला लेट फीस पेमेंट करावी लागेल. ही रक्कम 1000 रुपये आहे. पेमेंट केल्यानंतरच पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून कंफर्ण केलं जाईल. Bank Loan: लोन अप्लाय करताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष, बँक घरी बोलवून देईल कर्ज पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत सरकार वाढवणार का? एक्सपर्ट सांगतात की, सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवावी. कारण तसे न केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांनी म्हटलं की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. अशा वेळी ज्या टॅक्स पेयर्सचे पॅन लिंक केलेले नाही त्यांच्यासाठी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून रोजीच संपते. अशा लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल. दुसरीकडे, काहींचे म्हणणे आहे की पॅन लिंकिंगची अंतिम मुदत संपल्यामुळे अनेक कामे पेंडिंग राहू शकतात. अशा वेळी ती लिंक करण्याची अंतिम मुदत सुमारे 4 महिन्यांनी वाढवली जावी. पॅन लिंक नसेल तर काय होईल? -तुम्ही रिटर्न फाइल करू शकणार नाही. रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे -लेट रिटर्नची प्रक्रिया केली जाणार नाही -तुमच्या टॅक्स रिफंडमध्ये वाढ होईल. -इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये सुधारणा करण्यासही परवानगी दिली जाणार नाही -अशा प्रकारच्या रिफंडवर कोणतेही व्याज मिळणार नाही -TDS आणि TCS जास्त दराने कापले जाऊ शकतात -अशा पॅनचा बँकिंग व्यवहारांवरही परिणाम होईल. ATM Card वर का लिहिलेला असतो 16 डिजिटचा नंबर, तुम्हाला याचा अर्थ माहितीये? पॅनला आधार लिंक कसं करायचं? आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर जाऊन तुम्ही आधारशी पॅन लिंक करू शकता. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने मार्च 2022 रोजी एक अधिसूचना जारी केली की सर्व लोकांना आधार कार्ड पॅनशी लिंक करणे अनिवार्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या