JOIN US
मराठी बातम्या / मनी / 18 रुपयांचा शेअर 4 महिन्यांत झाला 1300 रुपयांचा, 10 हजारांच्या गुंतवणुकीवर लाखोंचा रिटर्न

18 रुपयांचा शेअर 4 महिन्यांत झाला 1300 रुपयांचा, 10 हजारांच्या गुंतवणुकीवर लाखोंचा रिटर्न

शेअर बाजारातली तेजी-मंदी ही कायमच सुरू असते. पण अचानकच एखादा शेअर येतो आणि सगळ्या शेअर मार्केटमध्ये डंका वाजवून जातो. सध्या भारतीय शेअर बाजारात अशाच एका शेअरची जबरदस्त चर्चा सुरू आहे

जाहिरात

गेल्या वर्षी 21 सप्टेंबरला रूट मोबाइल स्टॉकमध्ये (Route Mobile stock) गुंतवण्यात आलेल्या एक लाख रुपयांचे आज 2.82 लाख रुपये झाले आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 मार्च : शेअर बाजारातली तेजी-मंदी ही कायमच सुरू असते. पण अचानकच एखादा शेअर येतो आणि सगळ्या शेअर मार्केटमध्ये डंका वाजवून जातो. सध्या भारतीय शेअर बाजारात अशाच एका शेअरची जबरदस्त चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे ऑर्किड फार्मा (Orchid pharma) कंपनीचा शेअर. ऑर्किड ही फार्मा कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. 3 नोव्हेंबर 2020 ला पुन्हा शेअर बाजारात लिस्ट झाली आणि त्या दिवसापासून 10 मार्च 2021 पर्यंत 128 दिवसांत या कंपनीचा एक शेअर 18 रुपयांवरून 1037. 55 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ज्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या शेअरमध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे त्याला आता अंदाजे 7.25 लाख रुपये मिळाले आहेत. म्हणजे या काळात या शेअरने गुंतवणूकदारांना 7000 टक्के नफा कमवून दिला आहे. ऑर्किड फार्मा शेअरने जगात चर्चेत असलेल्या बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीलाही मागे टाकलं आहे. याच काळात बिटकॉइनने (Bitcoin) 203 टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.

(वाचा -  कमाई करण्यासाठी BEST पर्याय, 5000 रुपये गुंतवणून लाखो मिळवा; सरकारही करेल मदत )

ऑर्किड फार्मा कंपनी काय आहे? ऑर्किड फार्मा ही चेन्नईतली कंपनी असून एनसीएलटीच्या रिझोल्यूशन प्लॅननंतर धनुका लॅब (Dhanuka labs) कंपनीने ऑर्किड फार्मामध्ये गुंतवणूक केली. 3 नोव्हेंबर 2020 ला हा शेअर रिलिस्ट झाला. त्यानंतर हा इतका वेगाने पळायला लागला की, गेल्या 128 दिवसात त्यात दररोज अप्पर सर्किट लागत आहे. बुधवारी 10 मार्चलाही या शेअरमध्ये 5 टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (National Stock Exchange) हा शेअर 1307.55 रुपयांना बंद झाला. या आर्थिक वर्षात डिसेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल 102.63 कोटी रुपये होता आणि कंपनीला 45.33 कोटी रुपयांचा तोटा झाला. मार्च 2020 मध्ये कंपनीचा महसूल 505.45 कोटी रुपये होता आणि 149.84 कोटी रुपयांचा तोटा होता. या फार्मा कंपनीचं मार्केट कॅप आता 5000 कोटी रुपये झालं आहे. ऑर्किड फार्मामध्ये धनुका लॅबची गुंतवणूक 98.04 टक्के आहे. इतर आर्थिक संस्थांचा हिस्सा 1.19 टक्के आहे, तर रिटेल गुंतवणूकदारांचा वाटा फक्त 0.5 टक्के इतका आहे. कंपनीचे शेअर इतक्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत असं शेअर मार्केट तज्ज्ञांचं मत आहे.

(वाचा -  कमी पैशात सुरू करा हा जबरदस्त व्यवसाय; दर महिन्याला होईल 40 हजारांपर्यंत कमाई )

शेअर बाजारातील हा अनोखा खेळ रोचक असतो, पण गुंतवणूक करताना मात्र त्यातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केलेली योग्य ठरू शकते. कारण अनेकदा शेअरच्या किमती वाढतात आणि नंतर गुंतवणूकदार अडकून पडतात. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन जरूर घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या