JOIN US
मराठी बातम्या / मनी / दिवाळीत वाढतोय ऑनलाइन सट्टेबाजीचा ट्रेंड, त्यावर किती कर आकारला जातो? वाचा सविस्तर

दिवाळीत वाढतोय ऑनलाइन सट्टेबाजीचा ट्रेंड, त्यावर किती कर आकारला जातो? वाचा सविस्तर

दिवाळीला जुगार किंवा सट्टा आता बहुतांशी ऑनलाइन खेळला जातो. त्याची खासीयत म्हणजे जगात कुठेही बसलेले लोक आपले मित्र किंवा नातेवाईक इत्यादींना पैजेत सामील करू शकतात.

जाहिरात

दिवाळीत वाढतोय ऑनलाइन सट्टेबाजीचा ट्रेंड, त्यावर किती कर आकारला जातो? वाचा सविस्तर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 ऑक्टोबर: दिवाळीच्या रात्री जुगार खेळण्याची प्रथा आपल्या देशात अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अजूनही हा ट्रेंड खूप लोकप्रिय आहे.गेल्या काही वर्षांत कोविड 19 आणि लॉकडाऊनमुळे या ट्रेंडमध्ये बदल होताना दिसत आहे. दिवाळीचा जुगार किंवा सट्टा आता बहुतांशी ऑनलाइन खेळला जातो. त्याची एक खासियत म्हणजे यात जगात कुठेही बसलेले लोक आपले मित्र किंवा नातेवाईक इत्यादींना पैजेत सामील करू शकतात. भरावा लागतो मोठा कर- ऑनलाइन जुगाराच्या ट्रेंडमध्ये अनेक सुविधांसोबतच एक मोठी समस्या देखील आहे. हे कराच्या कक्षेत येतं. पारंपारिक जुगाराच्या विपरीत येथे बक्षीस किंवा जिंकलेली रक्कम कर वजा केल्यावरच उपलब्ध होते कारण सर्व काही रेकॉर्डवर असतं. आयकर नियमांनुसार पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाइन गेममध्ये लॉटरी, हॉर्स रेस, स्पोर्ट्स बेटिंग, गेम ऑफ चान्स इ. त्यामुळे, ऑनलाइन गेमिंगमधून मिळालेल्या रकमेवर कोणत्याही सूट मर्यादेशिवाय प्राप्तिकराच्या सर्वोच्च दरानं कर कापला जातो. हेही वाचा:  क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही करताय का ‘ही’ चूक? ऑनलाइन गेम जिंकण्यावर किती कर- अर्चित गुप्ता, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, टॅक्सक्लियर यांच्या मते, वेबसाइट्स इत्यादींमधून जिंकलेल्या रकमेबाबतीत जर बक्षीस रक्कम रु. 10,000 पेक्षा जास्त असेल, तर विजेत्याला टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स (TDS)  कापला जातो नंतर 31.2 टक्के आयकर (आयकर नियम 194 बी नुसार 30 टक्के आयकर आणि लागू उपकर) कापून उर्वरित रक्कम मिळते. कोणतीही कर सूट किंवा कपात उपलब्ध नाही- कलम 80C किंवा 80D अंतर्गत कोणत्याही वजावटीला परवानगी नाही किंवा जुगाराच्या उत्पन्नातून इतर कोणतीही वजावट/भत्ता, मूळ सूट मर्यादा आणि आयकर स्लॅब रेटचा लाभ देखील या उत्पन्नावर लागू होत नाही. TDS कापल्यानंतर बक्षीस- बहुतेक ऑनलाइन कॅसिनो विजेत्याला बक्षीस रक्कम देण्यापूर्वीच 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर TDS कापण्याच्या धोरणाचे पालन करतात. तथापि काही प्रकरणांमध्ये ऑनलाइन कॅसिनो साइट खेळाडूंना बक्षीसाची संपूर्ण रक्कम काढू शकतात. अशा प्रकरणांमध्ये त्यांचे वार्षिक आयकर रिटर्न (ITR) भरताना जुगारातील उत्पन्नाविषयी अचूक माहिती देणे ही करदात्यांची जबाबदारी आहे.

ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी लागू आहे का? सध्या ऑनलाइन गेमिंगमध्ये दुहेरी कर प्रणाली आहे. कौशल्य खेळांवर (सट्टेबाजी किंवा जुगाराचा समावेश नाही) सरकार 18 टक्के जीएसटी आकारते. सट्टेबाजी आणि जुगारासह अशा खेळांवर 28 टक्के जीएसटी लागू होतो. ऑनलाइन गेमिंग अॅप्सवर मुख्यतः 18 टक्के जीएसटी लागू होतो, तर कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लागू होतो.-

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या