JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: पुन्हा उतरले सोन्याचे दर, चांदीच्या दरात मात्र उसळी; वाचा आजचा भाव

Gold Price Today: पुन्हा उतरले सोन्याचे दर, चांदीच्या दरात मात्र उसळी; वाचा आजचा भाव

Gold Price Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर जूनच्या वायदा सोन्याची किंमत 0.29 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर चांदीमध्ये (Silver Price Today)काहीशी उसळी पाहायला मिळते आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 एप्रिल: सोन्याच्या किंमतीमध्ये आज काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Multi Commodity Exchange) वर जूनच्या वायदा सोन्याची किंमत 0.29 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर चांदीमध्ये (Silver Price Today) काहीशी उसळी पाहायला मिळते आहे. मे महिन्यासाठी चांदीची वायदा किंमत (Silver Price) 0.45 ने वधारल्याचं पाहायला मिळालं आहे. एमसीएक्सवर मेच्या चांदीच्या वायदा किंमतीत 225 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यानंतर चांदीचे दर 68,635 रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटबद्दल बोलायचे झाल्यास अमेरिकन ट्रेजरीमध्ये आलेल्या मंदीदरम्यान सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. आधीच्या सत्रात स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 1,766.32 डॉलर प्रति औंस होती. ब्रोकरेजच्या माहितीनुसार  1725 डॉलर पेक्षा सोन्याचे दर कमी होणं मंदीचे संकेत असू शकतात. (हे वाचा- डॉमिनोज इंडियावर Cyber Attack! ग्राहकांची महत्त्वाची माहिती डार्क वेबवर ) सोन्याचे दर (Gold Price on MCX) मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची जूनची वायदे किंमत 139 रुपयांनी कमी झाली आहे. यानंतर सोन्याचा दर प्रति तोळा 47,254 रुपयांवर पोहोचला आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 47850 या स्तरावर पोहोचले होते. 24 कॅरेट सोन्याचा भाव Goodsreturns.in च्या मते 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 50,630 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 46080 रुपये प्रति तोळा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये हा भाव अनुक्रमे 49610 रुपये आणि 49040 रुपये प्रति तोळा आहे. हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 48610 रुपये प्रति तोळा असून बंगळुरुमध्ये हा दर 48610 रुपये प्रति तोळा आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 46410  रुपये आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 45080 रुपये प्रति तोळा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये हा भाव अनुक्रमे 46910 रुपये आणि 44960 रुपये प्रति तोळा आहे. हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 44150 रुपये प्रति तोळा असून बंगळुरुमध्ये हा दर 44150 रुपये प्रति तोळा आहे. कोरोना काळात सोन्यातील गुंतवणूक वाढली कोरोना काळात (Coronavirus Pandemic) गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली आहे. 2020-21 आर्थिक वर्षात सोन्याची आयात 22.58 टक्क्याने वाढून 34.6 अब्ज डॉलर अर्थात 2.54 लाख कोटी झाली आहे. आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षात चांदीची आयात 71 टक्क्यांनी कमी होऊन 79.1 कोटी डॉलर झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या