JOIN US
मराठी बातम्या / मनी / Pension Scheme: अटल पेन्शन योजना आणि NPS कडे लोकांचा कल वाढला, सबस्क्रायबर्स संख्येत 22 टक्के वाढ

Pension Scheme: अटल पेन्शन योजना आणि NPS कडे लोकांचा कल वाढला, सबस्क्रायबर्स संख्येत 22 टक्के वाढ

PFRDA नुसार, NPS आणि अटल पेन्शन योजना या दोन योजनांची एकूण पेन्शन मालमत्ता 7,17,467 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यात वार्षिक आधारावर 28.21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : पेन्शन रेग्युलेटर PRFDA अंतर्गत दोन प्रमुख पेन्शन योजनांतील ग्राहकांची संख्या या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस 22 टक्क्यांहून अधिक वाढून 5.07 कोटी झाली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PRFDA) ने गुरुवारी सांगितले की, फेब्रुवारी 2022 अखेरीस, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) अंतर्गत विविध योजनांमधील ग्राहकांच्या संख्येत वार्षिक 22 टक्क्यांनी वाढून 507.23 लाख झाली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये ही संख्या 414.70 लाख होती. वार्षिक आधारावर ही वाढ 22.31 टक्के आहे. PFRDA नुसार, NPS आणि अटल पेन्शन योजना या दोन योजनांची एकूण पेन्शन मालमत्ता 7,17,467 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यात वार्षिक आधारावर 28.21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पीएफआरडीएच्या आकडेवारीनुसार, एनपीएस केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या श्रेणीतील ग्राहकांची संख्या 5 टक्क्यांनी वाढून 22.75 लाख झाली आहे. त्याचवेळी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या वार्षिक आधारावर 9.22 टक्क्यांनी वाढली असून ही संख्या 55.44 लाख झाली आहे. गृहकर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा; सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी ‘हे’ करा कॉर्पोरेट क्षेत्रातही ग्राहकांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या 13.80 लाख झाली आहे. सर्व नागरी क्षेत्रातील ग्राहकांमध्ये 37.70 टक्के वाढ झाली असून या क्षेत्रातील ग्राहकांची संख्या 21.33 लाख झाली आहे. NPS लाइट मोडमध्ये पेन्शन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या फेब्रुवारी 2022 अखेर 41.88 लाख होती. 1 एप्रिल 2015 पासून या श्रेणीत कोणतीही नवीन नोंदणी केली जात नाही. APA Lite 1 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आला. फेब्रुवारीच्या अखेरीस अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांच्या संख्येत 29 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण सबस्क्रिप्शन 3.52 कोटींवर पोहोचलं आहे. Gold Price:सततच्या वाढीनंतर आज सोने-चांदी दरात मोठी घसरण, तपासा 22 कॅरेटचा आजचा भाव NPS म्हणजे काय? नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPS ही एक सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे, जी केंद्र सरकारने 2004 मध्ये सुरू केली होती. सन 2009 पासून ही योजना खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठीही खुली करण्यात आली. अटल पेन्शन योजना काय आहे? आम्ही तुम्हाला सांगतो की अटल पेन्शन योजना ही भारतातील नागरिकांसाठी हमी दिलेली पेन्शन योजना आहे. ही योजना 9 मे 2015 रोजी लाँच करण्यात आली. तुम्ही जितक्या कमी वयात या योजनेत सामील व्हाल तितका तुम्हाला फायदा जास्त होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या