टॅक्स
नवी दिल्ली, 22 मे : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. आयटीआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपले टॅक्स दायित्व ठरवले जाते आणि आपल्याला टॅक्स सूट मिळते. म्हणून, आयटीआर भरताना, सर्व आवश्यक माहिती गोळा केली पाहिजे आणि आयकर कायद्यात दिलेल्या सर्व टॅक्स सूट आणि कपात माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 24(b) अंतर्गत होम लोनचं व्याज भरण्यावर टॅक्स सूट मागू शकता. महत्त्वाचं म्हणजे ही सूट बांधकामाधीन घराच्या व्याजावरही मिळते.
घराचा ताबा घेतल्यानंतर तुम्ही या सूटचा दावा करू शकता. फक्त कलम 24 (B) अंतर्गत सूट फक्त तुम्ही जुन्या कर प्रणालीतून ITR फाइल केल्यावरच मिळेल. टॅक्स एक्सपर्ट म्हणतात की, आयकर भरणारा घराचा ताबा मिळाल्यानंतर 5 वर्षांसाठी या सूटचा दावा करू शकतो. परंतु, गृहकर्जावर भरलेले व्याज एका आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला ही सूट मिळणार नाही.
AC फिल्टर एवढ्या दिवसात करा स्वच्छ, अन्यथा कूलिंग होईल कमी अन् वाढेल उष्णताविशेष बाब म्हणजे कलम 24 (बी) अंतर्गत सूट मिळवण्यासाठी करदात्याकडे घराचा ताबा असणे आवश्यक आहे. ताबा मिळाल्यानंतर, आयकरदात्याला घराच्या बांधकामादरम्यान होम लोनवर भरलेल्या व्याजावर सूट मिळू शकते. जर एखाद्या करदात्याने घराचा ताबा घेण्यापूर्वी रु. 4 लाख व्याज म्हणून भरले असेल आणि आयकर निर्धारण वर्षात 1 लाख रुपये होम लोनचं व्याज भरायचं असेल तर कलम 24(बी) नुसार, ती व्यक्ती या 1 लाख सोबतच 80 हजार रुपये (4 लाख/ 5) अतिरिक्त व्याजावर सूट मागू शकतो.
नेटवर्क प्रॉब्लममुळे कंटाळलाय? जुना नंबर या सोप्या पद्धतीने करा पोर्ट, घसरबसल्या मिळेल नवं सिमअशा प्रकारे, त्याला पुढील पाच वर्षांसाठी घराच्या बांधकामादरम्यान भरलेल्या व्याजावर सूट मिळू शकते. म्हणून, कलम 24(b) चा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी, टॅक्सपेयरर्सला असेसमेंट ईयरमध्ये होम लोनवर फेडलेले लोन पाहावे लागेल. यानंतर त्यामध्ये घराचा ताबा मिळण्यापूर्वी फेडलेल्या पूर्ण व्याजाला जोडावे लागेल. ताबा मिळाल्याच्या पाच वर्षांपर्यंत 5 हप्त्यांमध्ये दरवर्षी फेडलेल्या व्याजामध्ये मागच्या व्याजाला मिळून सूटचा दावा केला जाऊ शकतो.