स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिलं आहे. त्यांनी गृह कर्जाच्या दरात 0.20 टक्क्यांनी घट केली आहे. 1 सप्टेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.
मुंबई, 03 सप्टेंबर : देशाची सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांना नवी सुविधा देणार आहे. या सुविधेत SBIच्या ग्राहकांना 2 लाख रुपये विमा मिळणार. तोही मोफत. SBI कार्ड लवकरच रुपे क्रेडिट कार्ड आणणार आहे. NPCI नं रुपे कार्ड तयार केलंय. रुपे कार्ड UPI, IMPS आणि BHIM अॅपसारखं उपयोगी आहे. RuPay आपण तयार केलेली डेबिट आणि क्रेडिट कार्डप्रमाणे आहे. या देशांमध्ये आहे रुपे कार्ड रुपे कार्ड भूतान, सिंगापूर या देशांमध्ये चालतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच संयुक्त अरब अमिरात इथे रुपे कार्ड सुरू केलंय. हे कार्ड 5 प्रकारात उपलब्ध आहे. क्लासिक डेबिट कार्ड, रुपे क्लासिक क्रेडिट कार्ड, रुपे प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड. रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डात बऱ्याच सुविधा दिल्या जातात. आजही पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, ‘हे’ आहेत तुमच्या शहरातले दर SBI मध्ये 56 जागांवर व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज काय आहे RuPay कार्ड? रुपे शब्द दोन इंग्लिश शब्दांनी तयार झालाय. रुपये आणि पे. आता आपण विजा किंवा मास्टर डेबिट कार्ड वापरतो, त्याची पेमेंट पद्धत परदेशी आहे. त्याची फी द्यावी लागते. रुपे कार्ड इतर कार्डापेक्षा स्वस्त आहे. ते भारतानं बनवलंय. हे कार्ड इन्शुरन्सची रक्कमही देतं. नोकरदारांसाठी ‘हे’ आहेत गुंतवणुकीचे 4 उत्तम पर्याय 2 लाख रुपयांचा इन्शुरन्स मोफत रुपे कार्डधारकांना अपघात विमा मिळतो. कार्डधारकाला 1 लाख रुपयांच्या इन्शुरन्स मिळतो. अपघातात शरीरातला अवयव निकामी झाला तर 1 ते 2 लाखांपर्यंत विमा मिळू शकतो. मृत्यू झाला तर तेवढे पैसे कुटुंबाला मिळतात. नैसर्गिक मृत्यूनंतर मात्र कुटुंबाला पैसे मिळत नाहीत. जगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO