मुंबई, 8 जुलै : भाभा अणू संशोधन केंद्रात म्हणजेच BARC मध्ये विविध पदांवर भरती आहे. एकूण 47 पदं भरायची आहेत. प्लँट आॅपरेटर, लॅब असिस्टंट, फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, इलेक्ट्राॅनिक मेकॅनिक, एसी मेकॅनिक, पेंटर अशी एकूण 47 पदं आहेत. पदं आणि पदांची संख्या प्लांट ऑपरेटर - 7 लॅब असिस्टंट - 4 फिटर - 12 वेल्डर - 2 टर्नर - 1 इलेक्ट्रिशिअन - 4 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक - 8 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 4 A/C मेकॅनिक - 1 टेक्निशिअन-C (बॉयलर ऑपरेटर) - 3 टेक्निशिअन-B (पेंटर) पेंटर - 1 खूशखबर, बजेटनंतर सोन्या-चांदीचे भाव स्थिरावले, जाणून घ्या आजचा दर ONGC च्या नाॅन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी असं डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड शैक्षणिक पात्रता या पदांसाठी 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण हवं. कमीत कमी 60 टक्के मार्क्स मिळायला हवेत. स्टायपेंडरी ट्रेनीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित उत्तीर्ण हवं. टेक्निशियन पदासाठी प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र हवं. सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे बुडाले 3.20 लाख कोटी रुपये वयाची मर्यादा 7 आॅगस्ट 2019 रोजी स्टायपंडरी ट्रेनीसाठी 18 ते 22 वर्ष हवीत. टेक्निशियनसाठी 18 ते 25 वर्ष हवीत. अर्जाची फी सामान्य आणि ओबीसींना 100 रुपये आहे. तर इतर मागास आणि महिलांना फी नाही. आॅनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 आॅगस्ट 2019. अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1YYkDlDclgGK5O1OWOekQ26l-NN8cvl7L/view इथे क्लिक करा. नोकरीचं ठिकाण तारापूर आणि कल्पक्कम इथे आहे. याशिवाय माझगाव डाॅक शिपयार्ड लिमिटेडनं रिगर आणि इलेक्टिशियन पदांसाठी 366 व्हेकन्सीज काढल्यात. त्यात रिगर पदासाठी 217 व्हेकन्सीज आहेत आणि इलेक्ट्रिशियन पदासाठी 149 व्हेकन्सीज आहेत. या पदांची भरती 2 वर्षाच्या काॅन्ट्रॅक्टच्या आधारे होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 जुलै. रिगर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 8वी पास असला पाहिजे. उमेदवारनं रिगर, फिटर ट्रेडमध्ये एनएसी सर्टिफिकेट कोर्स केला असला पाहिजे. इलेक्ट्रिशियन पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10वी उत्तीर्ण असायला हवेत. सोबत संबंधित ट्रेडचं प्रमाणपत्र हवं. लोकसभा अध्यक्षांचा स्वागत सोहळा सुरू असताना स्टेज कोसळला, VIDEO व्हायरल