JOIN US
मराठी बातम्या / मनी / NPS: निवृत्तीनंतर काय होईल याचं टेन्शन सोडा, सुरक्षित भविष्यासाठी आजपासून सुरु करा गुंतवणूक

NPS: निवृत्तीनंतर काय होईल याचं टेन्शन सोडा, सुरक्षित भविष्यासाठी आजपासून सुरु करा गुंतवणूक

राष्ट्रीय पेन्शन सिस्टम अंतर्गत जमा केलेली रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80CCD(1B) अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतच्या कर सवलतीसाठी पात्र आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 मार्च : भविष्याच्या नियोजनासाठी (Future Planning) आपण रात्रंदिवस काम करतो. पुढील काळ चांगला जाण्यासाठी आपण पैसे गोळा करतो, वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो. कारण निवृत्तीनंतर शरीर आणि उत्पन्न दोन्ही साथ साथ देत नाहीत. त्यामुळे भविष्याचं नियोजन ठोस असायला हवं. सध्या बाजारात अनेक प्रकारच्या सेवानिवृत्ती योजना (Pension Scheme) आहेत, ज्याच्या आधारे आपण आपलं भविष्य सुरक्षित करू शकतो. नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System), सरकारच्या सहकार्याने चालवली जात आहे, सेवानिवृत्ती नियोजनासाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेतील गुंतवणूक वयाच्या 18 व्या वर्षापासून सुरू करता येते. लहान वयातच गुंतवणूक सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे निवृत्तीच्या वयापर्यंत तुम्ही खूप मोठा निधी जमा करू शकता. खाते कसे उघडायचे? NPS खाते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उघडता येते. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन हे खाते उघडू शकता. याशिवाय enps.nsdl.com किंवा enps.karvy.com वरूनही खाते उघडता येते. Multibagger Stock : दोन वर्षात 1500 टक्के रिटर्न, एक लाखांची गुंतवणूक बनली 16 लाख रुपये जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 18 व्या वर्षापासून राष्ट्रीय पेन्शन सिस्टममध्ये दरमहा 5,000 रुपये गुंतवले, तर निवृत्तीनंतर त्याला पेन्शनच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळण्याचा हक्क असेल. कारण 18 ते 60 वर्षे म्हणजेच 42 वर्षापर्यंत त्यांना या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. दरमहा 5000 रुपये, वर्षभरात 60,000 रुपये NPS मध्ये जमा केले जातील. अशा प्रकारे 42 वर्षात या खात्यात 25.20 लाख रुपये जमा होतील. या गुंतवणुकीवर दरवर्षी 10 टक्के परतावा गृहीत धरला, तर मॅच्युरिटीवर ही रक्कम 3.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. या ठेवीपैकी 40 टक्के अॅन्यूटीमध्ये हस्तांतरित करा. अशा प्रकारे, 60 वर्षांनंतर, गुंतवणूकदारांना दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळेल. महिन्याला 10 हजार भरा आणि 16 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या काय ही सुरक्षित गुंतवणूक जर तुम्ही 40 टक्के अॅन्युइटी घेत असाल आणि अॅन्युइटीचा दर वार्षिक 8 टक्के असेल, तर तुम्हाला निवृत्तीनंतर 2.28 कोटी एकरकमी मिळतील आणि 1.52 कोटी वार्षिकीमध्ये जातील. आता या अॅन्युइटी रकमेतून तुम्हाला दरमहा 1,01,390 रुपये पेन्शन मिळेल. अॅन्युइटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी जास्त पेन्शन तुम्हाला मिळेल. राष्ट्रीय पेन्शन सिस्टम अंतर्गत जमा केलेली रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80CCD(1B) अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतच्या कर सवलतीसाठी पात्र आहे. अॅन्युइटी म्हणजे काय? अॅन्युइटी हा गुंतवणूकदार आणि विमा कंपनी यांच्यातील करार आहे. या अंतर्गत, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधील किमान 40 टक्के रक्कम अॅन्युइटी खरेदी करणे आवश्यक आहे. अॅन्युइटी अंतर्गत गुंतवलेली रक्कम निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात मिळते आणि उर्वरित रक्कम एकरकमी काढता येते. NPS मध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA द्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली जाते. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, सरकारी रोखे आणि गैर-सरकारी रोख्यांमध्ये गुंतवतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या