मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई, 12 मार्च : मुंबईतील रस्ते अपघाताच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई न्यायालयाने टायर फुटणे हे देवाचे कृत्य नसून मानवी निष्काळजीपणा आहे, अशी टिप्पणी केली. एका विमा कंपनीने रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याविरोधात याचिका दाखल केली होती. हीच याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आली. न्यायमूर्ती एसजी डिगे यांच्या एकल खंडपीठाने 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात, न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाच्या 2016 च्या निवाड्याविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळून लावले. यामध्ये पीडित मकरंद पटवर्धनच्या कुटुंबाला 1.25 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. 25 ऑक्टोबर 2010 रोजी पटवर्धन हे त्यांच्या दोन साथीदारांसह कारमधून पुण्याहून मुंबईकडे येत होते. दरम्यान कारच्या मागील चाकाचा टायर फुटून कार खड्ड्यात पडली. या अपघातात पटवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला.
घर घेण्याचा प्लान करताय?होम लोनवर महिलांना बंपर सूट देताय ‘या’ बँकान्यायाधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले होते की, पीडित हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहे. त्याच वेळी, विमा कंपनीने आपल्या अपीलात म्हटले होते की नुकसान भरपाईची रक्कम जास्त आहे आणि टायर फुटणे हे ईश्वराचे कृत्य आहे. चालकाच्या निष्काळजीपणाचे परिणाम नाही. त्याच वेळी, उच्च न्यायालयाने हे अपील स्वीकारण्यास नकार दिला आणि सांगितले की, डिक्शनरीमध्ये ऍक्ट ऑफ गॉडचा अर्थ ऑपरेशनमध्ये अनियंत्रित नैसर्गिक शक्तींचे उदाहरण आहे. या घटनेतील टायर फुटणे ही देवाची कृती म्हणता येणार नाही. हा मानवी निष्काळजीपणा आहे.
कोर्ट पुढे म्हणाले, ‘टायर फुटण्याची अनेक कारणे आहेत, जसे की जास्त वेग, कमी वारा, जास्त हवा किंवा सेकंड हँड टायर आणि तापमान.’ आदेशात म्हटले आहे की, ‘प्रवास करण्यापूर्वी गाडीच्या चालकाने टायर्सची स्थिती तपासली पाहिजे. टायर फुटणे ही नैसर्गिक क्रिया म्हणता येणार नाही. हा मानवी निष्काळजीपणा आहे.’ उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, केवळ अॅक्ट ऑफ गॉड म्हणणे म्हणणे हा विमा कंपनीला नुकसानभरपाई देण्यापासून मुक्त करण्याचा आधार असू शकत नाही.
पॅन-आधार लिंक करण्याचे फायदे माहितीये? मोठी कामं होतील सोपी