JOIN US
मराठी बातम्या / मनी / Multibagger Share: गुंतवणूकदारांचे पैसे 'या' शेअरमुळे महिनाभरात दुप्पट, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Multibagger Share: गुंतवणूकदारांचे पैसे 'या' शेअरमुळे महिनाभरात दुप्पट, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Multibagger share: अदानी विल्मरने (Adani Wilmar) 3 मे रोजी कोहिनूर ब्रँड विकत घेतल्यापासून कोहिनूर फूड्सच्या शेअर्समध्ये मोठी उसळी दिसून आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 मे : शेअर बाजारात (Share Market) दोन दिवसांपासून तेजी दिसत आहे. शुक्रवार, 27 मे रोजी सेन्सेक्स 632.13 अंकांच्या किंवा 1.17 टक्क्यांच्या वाढीसह 54,884.66 वर बंद झाला. निफ्टीही तेजीत होता आणि तो 182.30 अंकांच्या वाढीसह 16,352.45 वर बंद झाला. शुक्रवारच्या रॅलीचा मल्टीबॅगर स्टॉक कोहिनूर फूड्सवर देखील परिणाम झाला आहे आणि शुक्रवारी शेअर 38.40 रुपयांच्या (Kohinoor Foods share price) ऑल टाईम हाय पातळीवर पोहोचला. अदानी विल्मरने (Adani Wilmar) 3 मे रोजी कोहिनूर ब्रँड विकत घेतल्यापासून कोहिनूर फूड्सच्या शेअर्समध्ये मोठी उसळी दिसून आली आहे. अदानी विल्मर लिमिटेडने मॅककॉर्मिक स्वित्झर्लंड GmbH कडून कोहिनूर ब्रँडसह अनेक ब्रँड्स खरेदी करण्याची घोषणा केली होती. कोहिनूर बासमती ब्रँड हे भारतातील एक प्रसिद्ध नाव आहे. LIC New Policy: विमा रत्न पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे, चेक करा संपूर्ण कॅलक्युलेशन एका महिन्यात 158 टक्के परतावा कोहिनूर फूड्सच्या स्टॉकने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना मोठा फायदा करुन दिला आहे. या शेअरने एका महिन्यात 158.59% चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 29 एप्रिल रोजी शेअर 14.85 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, शुक्रवार 27 मे रोजी त्याची किंमत 38.40 रुपये झाली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर 21.14 टक्क्यांनी वधारला आहे. कोहिनूर फूड्सच्या शेअर्सने सहा महिन्यांत 395.49 टक्क्यांचा परतावा दिला आहे. Axis Bank कडून Average monthly balance सह इतर सेवा शुल्कात वाढ, वाचा सविस्तर सहा महिन्यांत 1 लाख रुपये 495,475 रुपये झाले एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी कोहिनूर फूड्सच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले होते, त्यानंतर आज त्याला या एक लाख रुपयांपैकी 258,585 रुपये मिळाले आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याची गुंतवणूक 4,95,475 रुपये झाली आहे. कोहिनूर फूड्स ही खाद्यपदार्थांच्या निर्मिती आणि विपणनातील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनी कोहिनूर ब्रँड नावाने बासमती तांदळाच्या अनेक जाती विकते. कोहिनूर फूड्सचे मजबूत पुरवठा नेटवर्क आहे. बासमती तांदळाव्यतिरिक्त, कोहिनूर रेडी टू इट करी, रेडीमेड ग्रेव्ही, कुकिंग पेस्ट, चटण्या, मसाले, फ्रोझन ब्रेड, स्नॅक्स आणि खाद्यतेल देखील विकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या