JOIN US
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stock : एका वर्षात 'या' शेअरमध्ये 120 टक्क्यांहून अधिक रिटर्न, अजून 35 टक्के वाढ अपेक्षित

Multibagger Stock : एका वर्षात 'या' शेअरमध्ये 120 टक्क्यांहून अधिक रिटर्न, अजून 35 टक्के वाढ अपेक्षित

Brokerage firm Centrum ने पॉलीकॅब इंडियाच्या मजबूत रेव्येन्यू ग्रोथमुळे या स्टॉकची टार्गेट प्राईज (Polycab India Share Target Price) 3110 रुपये ठेवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑक्टोबर : पॉलीकॅब इंडियाच्या (Polycab India) शेअर्सनी यावर्षी मल्टीबॅगर रिटर्न दिले आहे. 2021 मध्ये स्टॉकची किंमत 120 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये सुमारे 141 टक्कांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पॉलीकॅब इंडियाच्या शेअरची किंमत (Polycab India Share Price) सुमारे 945 रुपये होती, जी आता प्रति शेअर 2290 रुपये झाली आहे. ब्रोकरेज फर्म सेंट्रमला (Brokerage firm Centrum) विश्वास आहे की या स्टॉकची किंमत आणखी वाढू शकते आणि पॉलीकॅब इंडियाच्या मजबूत रेव्येन्यू ग्रोथमुळे या स्टॉकची टार्गेट प्राईज (Polycab India Share Target Price) 3110 रुपये ठेवली आहे. स्टॉकच्या सध्याच्या किंमतीपेक्षा हे सुमारे 35 टक्के अधिक आहे. Paytm IPO : पेटीएम 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान 18300 कोटींचा आयपीओ आणणार, वाचा सविस्तर ब्रोकरेजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, पॉलीकॅब वायर्स आणि केबल्सची विक्री वर्षिक आधारावर सुमारे 44 टक्के वाढून 26.3 अब्ज रुपये झाली. केबल आणि वायर्स या दोन्ही श्रेणींमध्ये वाढ जवळपास समान होती. मात्र केबल्सला स्पर्धेचा देखील सामना करावा लागला आहे. पॉलीबॅक ही वायर आणि केबलची देशातील आघाडीची कंपनी आहे. त्याच्या उत्पादनांमध्ये पंखे, एलईडी लाइटिंग, ल्युमिनियर्स, स्विचेस, सोलार प्रोडक्ट्स आणि अॅक्ससरीज आहेत. JSL Share : जिंदाल स्टेनलेसमध्ये गेल्या 6 महिन्यात 140 टक्के नफा, अजूनही कमाईची पॉलीकॅब इंडियाचा एकत्रित निव्वळ नफा 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 9.4 टक्के घसरून 200.52 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 221.55 कोटी रुपये होता. ब्रोकरेजने सांगितले की कंपनीचे EBIT मार्जिन चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 11 टक्के-13 टक्क्याच्या श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुढील आर्थिक वर्षात तेजीची शक्यता आहे. पॉलीकॅब FY2022 मध्ये मार्केटमध्ये विस्तार करून त्याचं मार्केट वाढवण्यावर भर देईल. त्यामुळे कंपनीचं उत्त्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या