मुंबई, 21 मार्च : दर्शन ओरना लि. (Darshan Orna ltd) सोमवारी स्टॉक एक्सचेंजला सांगितले की कंपनीच्या शेअर्सच्या विभाजनावर (stock split) विचार करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी त्यांचे संचालक मंडळ 6 एप्रिल रोजी बैठक करणार आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं की, आम्ही SEBI (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, 2015 च्या रेग्युलेशन 29 च्या अनुषंगाने कंपनीच्या संचालक मंडळाला बुधवार 6 एप्रिल, 2022 रोजी शेअर विभाजनाचा विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक होईल. एका वर्षात 600 टक्के परतावा सोमवारी दर्शन ओरनाचा स्टॉक BSE वर सुमारे 5 टक्क्यांनी घसरून 88.05 रुपयांवर बंद झाला. विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 600 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तसेच कंपनीचा स्टॉक 2022 मध्ये सुमारे 14 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. PM Awas Yojna मधील नियमांत बदल, योजनेअंतर्गत मिळालेल्या घरात पाच वर्षे राहणे बंधनकारक 2011 मध्ये स्थापन झालेल्या दर्शन ओरना या कंपनीचे 2015 मध्ये सार्वजनिक कंपनीत रूपांतर करण्यात आले. हा एक लघु आणि मध्यम उद्योग (SME) आहे जो सोन्या-चांदीचे दागिने आणि दागिन्यांच्या व्यवसायात गुंतलेला आहे. कंपनीने उत्तर गुजरातमधील अहमदाबादमधील माणिक चौक परिसरात एक युनिट स्थापन करून सोन्या-चांदीचे दागिने आणि दागिन्यांचे घाऊक व्यापारी म्हणून व्यवसाय सुरू केला. Share Market Update: सेन्सेक्स 571 अंकांनी खाली, निफ्टी 17150 वर; ऑटो, पॉवर, बँक, रिअल्टी शेअर टॉप लूजर स्टॉक स्प्लिट म्हणजे काय? स्टॉक स्प्लिट किंवा शेअर स्प्लिटमुळे कंपनीतील शेअर्सची संख्या वाढते. उदाहरणार्थ 1 मध्ये 2 चे विभाजन केल्यास प्रत्येक गुंतवणूकदाराला एका शेअरसाठी 2 शेअर्स मिळतील आणि प्रत्येक शेअरचे मूल्य (Share Value) अर्धे केले जाईल. स्टॉक स्प्लिटमुळे प्रत्येक शेअरची बाजारातील किंमत कमी होते, परंतु कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Cap) बदलत नाही. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)