JOIN US
मराठी बातम्या / मनी / Moonlighting : कंपनीला कसं कळतं की, त्यांचा कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी देखील काम करतोय?

Moonlighting : कंपनीला कसं कळतं की, त्यांचा कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी देखील काम करतोय?

प्रश्न हा उभा राहातो की जर कर्मचाऱ्यांनीच कंपनीला सांगितले नाही तर कंपनीला हे कसं माहिती पडतं की तो दुसऱ्या कंपनीसोबत देखील काम करतो?

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 ऑक्टोबर : प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रोने नुकतेच मुनलाईटिंग प्रकरणार 300 लोकांना कामावरुन काढलं होतं, ज्यामुळे ही बातमी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. खरंतर आयटीमध्ये बहुतांश लोक हे मुनलाईटिंग करत असल्याचं आढलं आहे. परंतू काही कंपन्यांना यामुळे काहीही प्रॉबलम नाही तर काही कंपन्यांच्या पॉलिसीनुसार कर्मचाऱ्यांना असं करण्यास परवानगी नाही. ज्यामुळे ते जर असं काही करताना पकडले गेले, तर त्यांना कामावरुन काढून टाकण्यात येते. आता प्रश्न हा उभा राहातो की जर कर्मचाऱ्यांनीच कंपनीला सांगितले नाही तर कंपनीला हे कसं माहिती पडतं? जर आपण विप्रोचं उदाहरण घेतलं तर, मीडिया रिपोर्टनुसार या कंपनीने भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF च्या एम्प्लॉयर्स पोर्टलवरून युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे हे शोधून काढले. मात्र, याप्रकरणी अद्याप विप्रोकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. त्याच वेळी, राजीव मेहता नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने विप्रोने मुनलाईटिंग करणार्‍या कर्मचार्‍यांचा शोध कसा घेतला असावा असे संभाव्य मार्ग सांगितले आहेत. हे ही वाचा : विप्रोने तर कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढलं, पण इतर IT कंपन्यांचं Moonlightingवर मत काय? शेअर बाजाराबाबत टिप्स देणाऱ्या मेहता यांनी सोप्या शब्दात विप्रोला 300 कर्मचार्‍यांच्या चांदण्याबद्दल ट्विटच्या मालिकेत कसे कळले हे स्पष्ट केले आहे. राजीव मेहता यांचे ट्विट व्हायरल झाले असून लोकांनी त्यांच्यावर विविध कमेंट्स केल्या आहेत. मेहता यांनी ट्विट केले की, ‘‘विप्रोच्या ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले कारण ते वर्कफ्रॉम होमचा फायदा घेत. एकाच वेळी घरून दुसऱ्या कंपनीत काम करत होते. डिजिटलच्या प्रगतीमुळे या लोकांना अचूकपणे शोधून काढले गेले जे खूपच आश्चर्यकारक आहे. यासाठीच भारतात एक उत्तम व्यवस्था आहे.’’ खरंतर अशा काही कंपन्या देखील आहेत. ज्यांना कार्मचाऱ्यांनी दुसऱ्या कंपनीत काम केलं तरी त्यांना त्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले आहे आणि कर्मचाऱ्यांना तशी सुट देखील दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या