नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : मूडीज इन्व्हेस्टर्स सर्विस (Moody’s Investors Service) ने चालू आर्थिक वर्षामध्ये भारताच्या जीडीपीमध्ये 11.5 टक्क्यांची घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) 4 टक्क्यांची घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला होता. रेटिंग एजन्सीने शुक्रवारी अशी माहिती दिली की, कोरोना व्हायरस पँडेमिक (Coronavirus Pandemic) मुळे देशातील आर्थक व्यवहार धीम्या गतीने सुरू आहेत आणि त्यामुळे ग्रोथ रेट देखील कमी झाला आहे. मंद विकास दर कमकुवत वित्तीय व्यवस्था आणि सतत वाढत्या कर्जामुळे भारताचे क्रेडिट प्रोफाइलही कमकुवत झाले आहे. मूडिजने चिंता व्यक्त करत असे म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या या तणावामुळे अशाप्रकाचे आर्थिक व्यवस्था देशाला वित्तीय तुटीकडे नेऊ शकते. तथापि, देशाच्या मजबूत पायामुळे पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2022 मध्ये भारताची आर्थिक वाढ 10.6% होईल, अशी अपेक्षा मूडीजने व्यक्त केली आहे. (हे वाचा- याठिकाणी करा FD मध्ये गुंतवणूक, जाणून घ्या 6.95% पर्यंत व्याजदर देणार्या बँका ) मूडीज आधी फिचने (Fitch Ratings) देखील असाच अंदाज व्यक्त केला होत. फिचने मंगळवारी असे म्हटले होते की, यावर्षी भारताचा जीडीपी 10.5 टक्के घसरण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी ग्रोथ रेट -23.9% होता. काही रेटिंग एजन्सीजनी दुसऱ्या तिमाहीमध्ये देखील ग्रोथ रेट नकारात्मक राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे. या रेटिंग एजन्सीच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेत तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीमध्ये चांगली ग्रोथ पाहायला मिळेत. मात्र फिचने असा देखील अंदाज व्यक्त केला आहे की, भारतात जर कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणली गेली नाही तर तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीमध्ये विकास दर मंद राहू शकतो. (हे वाचा- PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! 8.5 टक्के व्याजाची रक्कम एकरकमी मिळण्याची शक्यता) फिचने जूनमध्ये देशातील जीडीपी 5 टक्के घसरेल असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र सप्टेंबरमध्ये त्यांनी ही टक्केवारी वाढवून 10.5 टक्के केली आहे. रेटिंग एजन्सी फिचने असे म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी 11 टक्के दराने वाढेल आणि त्याच्या पुढील वर्षी देशाचा आर्थिक विकास दर 6 टक्क्याहून अधिक असेल. आर्थिक वर्ष 2019-20 भारताचा इकॉनॉमिक ग्रोथ रेट 4.2 टक्के होते. फिचच्या मते यावर्षी भारताचे कोरोना व्हायरसमुळे 18.14 लाख कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे.