मुंबई, 01 सप्टेंबर : प्रत्येक जण नियमित रक्कम दर महिन्याला मिळेल अशी गुंतवणूक करू पाहतो. त्यामुळे निवृत्तीनंतर त्याला काळजी राहत नाही. आम्ही तुम्हाला अशाच काही गुंतवणुकीबद्दल सांगतोय. याला म्हणतात मंथली इन्कम स्कीम. पोस्ट ऑफिस, बँक, म्युच्युअल फंड्स इथे ही गुंतवणूक करता येते. त्याबद्दलच घेऊ जाणून - 1. पोस्ट ऑफिस MIS - ही योजना एकदम उपयुक्त आहे. याचा मॅच्युरिटी पिरियड 5 वर्षांचा असतो. यात 1 किंवा 2 ते 3 व्यक्ती पैसे गुंतवू शकतात. तुम्ही सिंगल अकाउंट उघडलंत तर 1500 ते 4-5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जाॅइंट उघडलंत तर 9 लाखापर्यंत गुंतवून दर महिन्याला व्याज घेऊ शकता. SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आजपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी, वाचतील तुमचे पैसे 2. म्युच्युअल फंड SWP - हा आहे सिस्टिमॅटिक विथड्राॅअल प्लॅन. त्यासाठी अगोदर तुम्हाला म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायला हवेत. ते तुम्ही SIP द्वारे गुंतवू शकता. तुमच्या फंडाची व्हॅल्यू बदलत असते. त्यासाठी ते कधी काढून घ्यायचे यासाठी प्लॅन करता येतो आणि दर महिन्याला ती रक्कम तुम्हाला मिळू शकते. PNB च्या FD व्याजात मोठे बदल, ‘हे’ आहेत नवे दर 3. फिक्स्ड डिपाॅझिट MIS - दर महिन्याला बँकेतल्या फिक्स्ड डिपाॅझिटमधून तुम्हाला पैसे मिळू शकतात. बँकेच्या व्याजदराप्रमाणे तुम्ही ही रक्कम घेऊ शकता. साधारणपणे मुदत ठेवीबाबत लोकांना लाँग टर्म हा एकच प्रकार माहीत असतो. पण जर तुम्ही भविष्यासाठी बचत करत असाल तर त्यावर आता दर महिना उत्पन्न मिळवू शकता. अनेक बँकांमध्ये मुदत ठेवीवर (फिक्स डिपॉजिट) दर महिना उत्पन्न देतात. याचा उपयोग तुम्हाला महिन्याभराच्या खर्चासाठी होऊ शकतो. यालाच मंथली इन्कम फिक्स डिपॉजिट सिस्टिम असे म्हणतात. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महागाईचे चटके, स्वयंपाकाचा गॅस ‘इतका’ झाला महाग मंथली इन्कम डिपॉझिट ही सामान्य फिक्स डिपॉझिट प्रमाणेच आहे. यामध्ये फक्त व्याज जमा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. साधारण मुदत ठेवीचा व्याज हा त्याची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मिळतो. पण कित्येक बँका महिना, तीन महिने किंवा सहा महिन्यांच्या कालावधीच्या आधारे व्याज देण्याची सुविधा देतात. यालाच मंथली इन्कम सुविधा म्हणतात. खोत विरुद्ध शेट्टी: कडकनाथ कोंबडीवरून राजकीय ‘फडफड’; पाहा स्पेशल रिपोर्ट