JOIN US
मराठी बातम्या / मनी / 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आजच दिवाळी! मोदी सरकारने DA आणखी 3% नी वाढवला

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आजच दिवाळी! मोदी सरकारने DA आणखी 3% नी वाढवला

DA Hike News Today: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting today) हा निर्णय घण्यात आला. केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. महागाई भत्त्याचा नवीन दर जुलै 2021 पासून लागू होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) अत्यंत आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकारने या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 3 टक्के महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढ मंजूर केली. खर्च विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महागाई वाढल्यामुळे केंद्र सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता डीए 28 टक्क्यांवरून (DA Hike News Today) वाढून 31 टक्के झाला आहे. आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting today) हा निर्णय घण्यात आला. केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. महागाई भत्त्याचा नवीन दर जुलै 2021 पासून लागू होईल. याआधी करण्यात आली होती वाढ 1 जुलै 2021 पासून सरकारने महागाई भत्ता 28 टक्क्यांनी वाढवला होता, जो त्याआधीच्या 17 टक्क्यांपेक्षा 11 टक्क्यांनी जास्त होता. परंतु 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी डीए फक्त 17 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने डीए वाढवला, म्हणजे मागील हप्ते वगळता, पुढील हप्त्यांमध्ये ही वाढ लागू करण्यात आली. वाचा- कंगाल पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट, पाकिस्तानी रुपया नीचांकी पातळीवर आता 31 टक्के डीएचं काय होणार कॅलक्यूलेशन? जर कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 56900 रुपये असेल, तर नवीन महागाई भत्त्त्यनुसार अर्थात 31 टक्क्यानुसार भत्ता 17639 रुपये प्रति महिना असेल. तर आधीच्या 28 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबाने 15932 रुपये/महिना DA मिळाला असता. म्हणजे एकूण महागाई भत्त्यात वाढ 1707 रुपये होईल. ही वाढ वार्षिक मोजली असता 20484 रुपये असेल. वाचा- खूशखबर! या बँक ग्राहकांना घरबसल्या मिळेल 20000 रुपयांपर्यंत कॅश, काय आहे सुविधा? महागाई भत्ता म्हणजे काय? महागाई भत्ता हा कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराचा एक निश्चित भाग असतो. कर्मचाऱ्यासाठी ही रक्कम अत्यंत महत्त्वाची असते कारण देशातील महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. तो वेळोवेळी वाढवला जातो. निवृत्तीवेतनधारकांना हा लाभ महागाई सवलत (DR) स्वरूपात मिळतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या