JOIN US
मराठी बातम्या / मनी / Mhada Lottery 2023 : मुंबईत हक्काचं घर हवं, कसा करायचा म्हाडासाठी अर्ज इथे पाहा

Mhada Lottery 2023 : मुंबईत हक्काचं घर हवं, कसा करायचा म्हाडासाठी अर्ज इथे पाहा

Mhada Lottery 2023 : मुंबईत हक्काचं घर विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी

जाहिरात

म्हाडासाठी कसा करायचा अर्ज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : मुंबईत आपलं छोटंसं का होईना घरं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र प्रत्येकाला ते आर्थिकदृष्ट्या परवडतं असं नाही. मात्र म्हाडाने अगदी कमी किंमतीत परवडणारी घरं आणली आहेत. आजपासून तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकता. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या विक्रीसाठी आज सोडत जाहीर होणार आहे. दुपारी 3 वाजेपासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जून असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर म्हाडाच्या घरांची ऑनलाईन सोडत 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता, वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे.

सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नयेत असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलं आहे. म्हाडामधील घरांची संख्या अत्यल्प  गट २७९० अल्प  गट २७८८ घरे मध्यम गट १३९ १२०

MHADA Lottery 2023 : म्हाडाचं घर घेतल्यानंतर ते भाड्याने देता येतं का?

कसा करायचा ऑनलाईन अर्ज आधी म्हाडाच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. तुमची माहिती, उत्पन्नाचा दाखल आणि इतर कागदपत्र तुम्हाला स्कॅन करून जोडायची आहेत अनामत रकमेचा भरणा बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करण्यासाठी २८ जून रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार

म्हाडाची 2 घरं मिळू शकतात? कसा अर्ज करायचा आणि काय आहे नियम पाहा

संबंधित बातम्या

प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 4 जुलै रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in  आणि https://www.mhada.gov.in वेबसाईटवर येणार प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे आणि हरकती 7 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येतील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 12 जुलै रोजी दुपारी 3 वाजता वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल​

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या