JOIN US
मराठी बातम्या / मनी / Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्यासाठी भरावे लागणार दुप्पट पैसे?

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्यासाठी भरावे लागणार दुप्पट पैसे?

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी, भरावे लागू शकतात दुप्पट पैसे?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : घरं घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर म्हाडामध्ये अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आधीच महागाईनं खिशाला भलीमोठी कात्री लागली आहे. त्यात म्हाडाकडून देखील घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी येत आहे. तुमच्यावर जास्त पैसे भरण्याची वेळ येऊ शकते. म्हाडाचं घर घेताना भराव्या लागणाऱ्या अनामत रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर तुम्हाला अनामत रक्कम जास्त भरावी लागू शकते. अनामत रकमेत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. वाढती महगाई आणि मंदीचं सावट आणि सध्याची एकूण स्थिती पाहता हा मोठा फटका म्हाडाचं घर घेणाऱ्यांना बसू शकतो.

MHADA Lottery 2023 : पुणेकर म्हाडासाठी अर्ज केला असेल तर या तारखा आहेत महत्त्वाच्या, चुकवू नका नाहीतर…

म्हाडाच्या कोकण मंडळानंसुद्धा पुण्याप्रमाणे अनामत रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच म्हाडाच्या उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. प्रस्ताव मंजूर झाला तर ठाणे, नवी मुंबई, वसई विरारमधील घरांसाठी म्हाडाच्या घरासाठीची अनामत रक्कम दुप्पट भरावी लागू शकते.

Mhada Lottery 2023 : आता 21 नाही तर फक्त 7 कागदपत्र जमा करा आणि घर घ्या

संबंधित बातम्या

सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यल्प आणि अल्प गटातील ग्राहकांसाठी देखील अनामत रक्कम दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कशी वाढू शकते रक्कम अत्यल्प गट- पूर्वी 5 हजार होती आता ही रक्कम 10 हजार केली जाण्याची शक्यता आहे. अल्प गटासाठी ही मर्यादा 10 हजार होती ती आता 20 हजार केली जाण्याची शक्यता आहे. मध्यम गटासाठी आता 30 हजार रुपये मोजावे लागणार आहेत उच्च गटासाठी 40 हजार रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे हा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. या प्रस्तावावर या आठवड्याअखेर निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याआधी कोणतीही वाढ केली जाणार नाही असं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा युटर्न घेणार का याची चर्चा सुरू झाली आहे. सर्वसामान्यांना घरं घेणं आता महाग होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या