JOIN US
मराठी बातम्या / मनी / तब्बल 40 दिवसानंतर Maruti Suzuki ने विकल्या 50 गाड्या, 25 मार्चपासून होती विक्री बंद

तब्बल 40 दिवसानंतर Maruti Suzuki ने विकल्या 50 गाड्या, 25 मार्चपासून होती विक्री बंद

25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर Maruti Suzuki चे देखील देशभरातील सर्व शोरूम बंद होते. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काहीशी सूट मिळाल्याने तब्बल 40 दिवसानंतर 50 गाड्या विकल्या गेल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 मे : कोरोना व्हायरसमुळे ऑटोमोबाइल क्षेत्राला देखील मोठा फटका बसला आहे. देशातील विविध कंपन्यांचे शोरूम आजही बंद आहेत. 25 मार्चपासून या कंपन्यांच्या गाड्या अजिबात विकल्या गेल्या नाही आहेत. 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर Maruti Suzuki चे देखील देशभरातील सर्व शोरूम बंद होते. दरम्यान लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काहीशी सूट मिळाल्यानंतर मारूती सुझुकीने त्यांचे देशातील काही शोरूम सुरू केले आहेत. दैनिक जागरण ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार 12 मे पासून मारूती सुझुकी त्यांच्या मानेसार प्लँटमध्ये उत्पादन सुरू करणार आहेत. लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट मिळाल्याने कंपनीने 2600 आउटलेट उघडण्याचे काम सुरू केले आहे. काही शोरूम दोन दिवसांपूर्वी उघडण्यात आले आहेत. यामध्ये तब्बल 40 दिवसानंतर 50 गाड्या विकल्या गेल्या आहेत. (हे वाचा- लॉकडाऊन 3.0 मध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता!आणखी तीन महिने मिळणार EMI वर सूट? ) वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये Maruti Suzuki चे एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली. 25 मार्चनंतर पहिल्यांदा गाड्यांची विक्री केल्याचं ते म्हणाले. जे 2600 आउटलेट आहेत त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेण्याचे काम सुरू असल्याचे श्रीवास्तव म्हणाले. मारूतीचे सुझुकीचे एकूण 3100 आउटलेट आहेत. 2600 वगळता इतर 500 रेड झोनमध्ये असल्याने ते उघडले जाण्याची शक्यता नाहीच आहे. कंपनीने बीएसईला दिलेल्या माहितीनुसार 12 मे पासून मारूती सुझुकी त्यांच्या मानेसार प्लँटमध्ये सुरक्षेसाठीच्या सर्व नियमांचे पालन करत उत्पादन सुरू करणार आहेत. (हे वाचा- 30 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकार मोठी मदत करण्याची शक्यता, ) श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने त्यांच्या रिसर्च टीमच्या साहाय्याने कार विक्री करण्यासंदर्भात काही प्रोटोकॉल तयार केले आहेत. जेणेकरून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात येणाऱ्या नियमांचे पालन होईल. टेस्ट ड्राइव्हसाठी देण्यात येणारी गाडी किंवा शोरूमध्ये येणाऱ्या गाड्या व्हायरस मुक्त कशा राहतील यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या