JOIN US
मराठी बातम्या / मनी / Manyavar IPO: मान्यवरची पॅरंट कंपनी Vedant Fashions चा प्राईज बँड निश्चित, 4 फेब्रुवारीला इश्यू ओपन होणार

Manyavar IPO: मान्यवरची पॅरंट कंपनी Vedant Fashions चा प्राईज बँड निश्चित, 4 फेब्रुवारीला इश्यू ओपन होणार

एथनिक वेअर ब्रँड मान्यवरची (Manyavar) मूळ कंपनी वेदांत फॅशन्स लिमिटेडने (Vedant Fashion Ltd) तिच्या 3,149 कोटी रुपयांच्या IPO साठी प्रति शेअर 824-866 रुपये प्राईज बँड निश्चित केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जानेवारी : मागील वर्षात शेअर बाजार IPOs ने गाजवला. या वर्षातही आता हळूहळू कंपन्या आपले IPO शेअर बाजारात उतरवण्यास सुरुवात करत आहेत. एथनिक वेअर ब्रँड मान्यवरची (Manyavar) मूळ कंपनी वेदांत फॅशन्स लिमिटेडने (Vedant Fashion Ltd) तिच्या 3,149 कोटी रुपयांच्या IPO साठी प्रति शेअर 824-866 रुपये प्राईज बँड निश्चित केली आहे. हा IPO 4 फेब्रुवारीला उघडेल आणि गुंतवणूकदार 8 फेब्रुवारीपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकतील. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 15 फेब्रुवारीला होणार आहे. IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये ड्राफ्ट पेपर सेबीकडे दाखल केला होता. कंपनीचा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल म्हणजेच OFS आहे. कंपनीचे विद्यमान प्रमोटर आणि भागधारक 3.63 कोटी शेअर्सची विक्री करतील. कंपनीचा IPO ही पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे, ज्यामुळे कंपनीला उभारलेल्या निधीचा फायदा होणार नाही. Nykaa च्या शेअरमध्ये महिनाभरात 24 टक्क्यांची घसरण, आता गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय? कंपनीच्या OFS मध्ये, Rhine Holdings Limited द्वारे 1.746 कोटी शेअर्स, केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडचे सुमारे 7,23,000 शेअर्स आणि रवी मोदी फॅमिली ट्रस्टचे 1.818 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. सध्या, कंपनीतील 7.2 टक्के हिस्सा Rhine होल्डिंग्सकडे, 0.3 टक्के केदारा एआयएफकडे, तर 74.67 टक्के हिस्सा रवी मोदी फॅमिली ट्रस्टकडे आहे. नोकरीऐवजी 2 लाख रुपयांमध्ये सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला मिळेल 5 लाखांचा भरघोस नफा, जाणून घ्या कंपनीची माहिती घेऊया वेदांत फॅशन पुरुषांच्या एथनिक वेअर सेगमेंटमध्ये व्यवसाय करते. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड ‘मान्यवर’ संपूर्ण भारतात आहे आणि भारतीय वेडिंग आणि सेलिब्रेशन वेअर विभागातील मार्केट लीडर आहे. याशिवाय त्वमेव (Twamev), मंथन (Manthan), मोहे (Mohey) आणि मेबाज (Mebaz) या ब्रँडचाही वेंडात फॅशनमध्ये समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या