JOIN US
मराठी बातम्या / मनी / चहाप्रेमी हा चहा घेणार का? 75000 रुपये किलोने झाली विक्री, वाचा काय आहे खासियत

चहाप्रेमी हा चहा घेणार का? 75000 रुपये किलोने झाली विक्री, वाचा काय आहे खासियत

आसाममधील लिलावात एका चहा तब्बल 75000 रुपये प्रति किलो दराने विकला गेला. नेमकी काय खासियत आहे या चहाची वाचा सविस्तर

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुवाहाटी, 30 ऑक्टोबर: आपल्या देशात चहाप्रेमाची बातच न्यारी आहे. केवळ एक चांगला चहा एखाद्याचा दिवस चांगला करू शकतं. पण केवळ उत्तम चहासाठी 75000 रुपये किलो दराने चहा खरेदी कराल का? तर हो, असं घडलं आहे. गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर (GTAC) ने गुरुवारी मनोहारी गोल्ड स्पेशलिटी चाय (Manohari Gold Speciality Tea) 75,000 रुपये प्रति किलो या दराने विकली आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी मिळालेली किंमत जास्त आहे. एका वर्षानंतर जीटीएसीने हा चहा विकला आहे आणि तोही 75 हजार रुपये प्रति किलो या दराने. पीटीआय एजन्सीला गुवाहाटी टी ऑक्शन बायर्स असोसिएशनचे सचिव दिनेश बिहानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. बिहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चहा विष्णू टी  कंपनीने खरेदी केला आहे. ही कंपनी ई-कॉमर्स वेबसाइटच्या साहाय्याने या चहाची विक्री करेल. ते असं म्हणाले की, ‘कोरोना काळातील ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. मनोहरी टी स्टेटने या चहाच्या निर्मितीसाठी विशेष व्यवस्था केली होती.’

गेल्या वर्षी 50 हजारांना विकला गेला होता हा चहा गेल्या वर्षी या चहाची किंमत 50000 रुपये प्रति किलो होती. आसामचा हा स्पेशालिटी चहा जगभरात प्रसिद्ध आहे. या चहाची चव, स्वाद आणि रंग अत्यंत सुंदर आणि मनमोहक असतो. त्यामुळे एवढ्या किंमतीला याचा लिलाव होतो. गेल्यावर्षी हा चहा देखील 75 हजारांना विकला होता गेल्या वर्ष 13 ऑगस्टला आसामचा आणखी एक खास चहा 75000 रुपये किलोने विकला होता. हा चहा डिकोम टी एस्टेट (Dikom Tea Estate) ने विकला होता. हा चहा गोल्डेन बटरफ्लाय टी (Golden Butterfly Tea) नावाने ओळखला जातो. चहाला असं नाव देण्यात आलं आहे कारण ही चहा पावडर बनवण्यासाठी  गोल्डन टिपचा वापर केला जातो. गेल्या वर्षी गुवाहाटी टी ऑक्शनमध्ये चहाच्या विक्रीबाबत दोन रेकॉर्ड बनले होते. बिहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार Orthodox Golden Tip Tea 75,501 रुपये प्रति किलो होती तर मनोहारी गोल्डची किंमत 50000 रुपये प्रति किलो होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या