मुंबई, 31 जानेवारी: पेमेंट सोल्यूशन्स प्रोव्हायडर कंपनी AGS Transact च्या शेअर्सची लिस्टिंग 31 जानेवारी रोजी कमकुवत झाली. कंपनीचे शेअर्स 175 रुपयांवर लिस्ट झाले. तर त्याची BSE वर लिस्टिंग 176 रुपये झाली आहे. AGS Transact पब्लिक इश्यूद्वारे 680 कोटी रुपये उभारत होते. हे पूर्णपणे ऑफर फॉर सेल होते. कंपनीची इश्यू किंमत 175 रुपये होती. AGS Transact चा इश्यू 19 जानेवारीला उघडला आणि 21 जानेवारीला बंद झाला होता. AGS Transact कंपनीचा इश्यू 7.79 पट सबस्क्राइब झाला होता. नॉन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर्ससाठी (NII) राखीव हिस्सा 25.61 पट सबस्क्राइब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनवेस्टर्ससाठीचा (QII) राखीव हिस्सा 2.68 पट आणि रिटेले इन्वेस्टर्सचा भाग 3.08 पटीने सबस्क्राईब झाला होता. BUdget 2022 : बजेटच्या तारखेपासून ते अर्थापर्यंत; बजेटबद्दल लोकांनी गुगलवर सर्च केल्या ‘या’ पाच गोष्टी कंपनीमध्ये आर्थिक सातत्य (Financial Consistency) नाही, म्हणजेच तिची कमाई किंवा कॅश फ्लो चढ-उतार होत असतात. यासह, बाजारातील निगेटिव्ह सेंटिमेंट, ऑफर फॉर सेल होणे, एकाच विभागावर पूर्ण अवलंबित्व, मर्यादित ग्राहक आणि तीव्र स्पर्धा यामुळे त्याची लिस्टिंग कमकुवत राहू शकते, असा अंदाज आधीच तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. अर्थसंकल्पाआधी ग्लोबल संकेत चांगले; SGX NIFTY 160 अंक वधारला, NIKKEI देखील मजबूत स्थितीत शेअर बाजाराची मजबूत सुरुवात अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. सकाळी 10.15 वाजता सेन्सेक्स 800 अंकांहून अधिकच्या मजबूतीसह 57,998 च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 229 अंकांच्या वाढीसह 17,331 च्या पातळीवर दिसत आहे. आज बँक शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.