JOIN US
मराठी बातम्या / मनी / ...तर PAN Card वर भरावा लागेल 10000 रुपये दंड, वाचा काय आहे नियम

...तर PAN Card वर भरावा लागेल 10000 रुपये दंड, वाचा काय आहे नियम

पॅन कार्ड 31 मार्च 2022 पर्यंत आपल्या आधार कार्डशी जोडणं महत्त्वाचं आलं आहे. जर तुम्ही या तारखेआधी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट होऊ शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 मार्च : पॅन कार्ड (PAN Card) धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड 31 मार्च 2022 पर्यंत आपल्या आधार कार्डशी जोडणं (PAN Card Link to Aadhaar Card) महत्त्वाचं आलं आहे. जर तुम्ही या तारखेआधी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट होऊ शकतं. तसंच पॅन-आधारशी जोडण्यासाठी नंतर 1000 रुपये भरावे लागतील. पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट झाल्यास मोठ्या समस्या येऊ शकतात. म्युचुअल फंड, स्टॉक, बँक खातं अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्डची गरज असते. पॅन-आधारशी लिंक न केल्यास पुढे अनेक गोष्टींसाठी अडचणी येऊ शकतात. या पॅन कार्डधारकांना द्यावे लागतील 10000 रुपये - एखाद्याने पॅन आधारशी लिंक नसल्याने ते डिअॅक्टिव्हेट झालेलं पॅन कार्ड एखाद्या ठिकाणी प्रूफ म्हणून दाखवलं तर मोठी समस्या येऊ शकते. डिअॅक्टिव्हेट झाल्याने आता वैध नसलेलं पॅन कार्ड वापरलं, तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272N अंतर्गत असेसिंग ऑफिसर अशा व्यक्तीला 10,000 रुपये दंड भरण्याचे निर्देश देऊ शकतात. ऑनलाइन कसं लिंक कराल पॅन-आधार - - सर्वात आधी इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा. - आधार कार्डवरील नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर टाका. - आधार कार्डमध्ये केवळ जन्मतारीख दिली असल्यास पुढे असलेल्या चौकोनात टीक करा. - आता कॅप्चा कोड एंटर करा. - आता Link Aadhaar वर क्लिक करा. - त्यानंतर पॅन-आधारशी लिंक होईल.

हे वाचा -  Online Fraud मध्ये पैसे कट झाले? या पद्धतीने मिळू शकतात परत

SMS द्वारे असं करा लिंक - तुमच्या फोनमध्ये UIDPAN टाइप करावं लागेल. त्यानंतर 12 अंकी आधार नंबर टाइप करा. त्यानंतर पॅन नंबर टाका. आता हा मेसेज 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा.

हे वाचा -  Ration Card नियमांत होणार मोठा बदल, आता केवळ याच लोकांना मिळणार धान्य

डिअॅक्टिव्हेट झालेलं पॅन कार्ड कसं चालू कराल? डिअॅक्टिव्हेट पॅन कार्ड चालू करता येऊ शकतं. त्यासाठी एक SMS करावा लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 10 अंकी पॅन नंबर मेसेजमध्ये टाइप करा. त्यानंतर स्पेस देवून 12 अंकी आधार नंबर एंटर करा आणि 567678 किंवा 56161 या क्रमांकावर SMS करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या