JOIN US
मराठी बातम्या / मनी / LIC Listing : गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जोरदार झटका; 9 टक्के डिस्काऊंटसह LIC चा शेअर लिस्ट

LIC Listing : गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जोरदार झटका; 9 टक्के डिस्काऊंटसह LIC चा शेअर लिस्ट

एलआयसीने 4 मे रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आयपीओ लाँच केला होता. कंपनीचे मजबूत ब्रँडिंग आणि मार्केट शेअर लक्षात घेता, IPO च्या सर्व विभागांना उच्च बोली मिळाल्या होत्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 मे : देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC Share Listing) मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाली. कंपनीचे शेअर आज त्यांच्या ऑफर प्राइस बँडवरून 9 टक्क्यांच्या सवलतीने लिस्ट झाले आहेत, याचा अर्थ गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. एलआयसीने 4 मे रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आयपीओ लाँच केला होता. कंपनीचे मजबूत ब्रँडिंग आणि मार्केट शेअर लक्षात घेता, IPO च्या सर्व विभागांना उच्च बोली मिळाल्या. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली. आज, NSE वर 9 टक्के सवलतीच्या दराने म्हणजेच 865 रुपयांवर शेअर्सचा व्यवहार सुरू झाला. म्हणजेच गुंतवणूकदारांचे प्रति शेअर सुमारे 84 रुपयांचे नुकसान झाले आहे. ICICI बँकेकडून पुन्हा एकदा FD व्याजदरात वाढ; 20 बेसिक पॉईंटपर्यंत वाढ, तुम्हाला कसा होईल फायदा BSE-NSE वर कामगिरी कशी होती? एलआयसीचे शेअर्स आज बाजारातील दोन्ही एक्सचेंजेसवर लिस्ट झाले. NSE वर त्याची लिस्टिंग 8.11 टक्के म्हणजेच 77 रुपयांच्या तोट्यात झाली आणि किंमत 872 रुपये निश्चित करण्यात आली. LIC चे शेअर्स BSE वर 867 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाले, जे सुमारे 9 टक्के तोटा दर्शवते. यापूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स 949 रुपयांच्या वरच्या बँडने खरेदी केले होते. तरुणांनी करिअरच्या सुरुवातीलाच घर घरेदी करावं का? काय होईल फायदा? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांचे किती नुकसान झाले? कंपनीने किरकोळ गुंतवणूकदार आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना प्रति शेअर 45 रुपये सवलत दिली होती, तर एलआयसीच्या पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपयांची सूट दिली होती. यानुसार आज लिस्ट केल्यानंतर या श्रेणीतील गुंतवणूकदारांचे नुकसानही कमी झाले आहे. पॉलिसीधारकांना प्रति शेअर केवळ 24 रुपयांचा तोटा झाला आहे, तर किरकोळ गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 39 रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. LIC IPO प्रत्येक विभाग ओव्हरसबस्क्राइब सरकारी कंपनी असल्याने, विमा क्षेत्रातील मोठा हिस्सा आणि मजबूत ब्रँडिंगमुळे एलआयसीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचा खूप विश्वास होता. हेच कारण आहे की 4 ते 9 मे या कालावधीत आयपीओच्या बोलीमध्ये 2.95 पट सबस्क्रिप्शन घेतली. म्हणजेच, बाजारात आलेल्या 16.2 कोटी शेअर्सच्या तुलनेत 47.77 कोटी शेअर्ससाठी बोली लागली. मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी लांब राहणंच पसंत केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या