JOIN US
मराठी बातम्या / मनी / LICनं रिलाँच केले दोन टर्म प्लॅन; पॉलिसीधारकांना मिळणार ‘हे’ फायदे

LICनं रिलाँच केले दोन टर्म प्लॅन; पॉलिसीधारकांना मिळणार ‘हे’ फायदे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही टर्म प्लॅन्स रिइंश्युरन्स रेट्स वाढल्यामुळं मागे घेण्यात आल्या आहेत. खरेतर, लाँच झाल्यापासून या मुदतीच्या योजनांच्या प्रीमियममध्ये कोणताही बदल झालेला नाही.

जाहिरात

LICनं रिलाँच केले दोन टर्म प्लॅन; पॉलिसीधारकांना मिळणार ‘हे’ फायदे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 नोव्हेंबर: LIC नं दोन टर्म प्लॅन मागे घेतले आहेत आणि नवीन वैशिष्ट्यांसह ते पुन्हा लाँच केले आहेत. एलआयसीच्या अंतर्गत परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार जीवन अमर आणि टेक टर्म प्लॅन मागे घेतले जात आहेत. हे प्लॅन मागे घेण्याचा निर्णय 23 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. त्याचबरोबर न्यू जीवन अमर आणि न्यू टेक टर्म प्लॅन लाँच करण्यात आला आहे. एलआयसी टेक टर्म प्लॅन ही ऑनलाइन पॉलिसी आहे तर एलआयसी जीवन अमर ही ऑफलाइन पॉलिसी आहे. वृत्तानुसार, रिइन्शुरन्सच्या वाढत्या खर्चामुळे या योजना मागे घेण्यात आल्या आहेत. नवीन प्लॅनचे काय फायदे? न्यू जीवन अमर आणि न्यू टेक टर्म या दोन्ही मुदत विमा प्लॅन आहेत. दोन्ही नवीन प्लॅन नॉन लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपिंग प्लॅन आहेत. म्हणजेच पॉलिसीधारकाला निश्चित प्रीमियम भरावा लागेल आणि त्या बदल्यात गॅरंटेड रिटर्न्स मिळतील. हेही वाचा:  फीचर असावं तर असं! Google Mapsमध्ये आलंय तुमच्या गाडीशी संबंधित जबरदस्त फीचर, ‘हा’ होणार फायदा जुने प्लॅन मागे घेण्याचा निर्णय का घेतला? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिइन्शुरन्स रेट वाढल्यामुळं हे टर्म इन्शुरन्स प्लॅन मागे घेण्यात आले आहेत. वास्तविक जीवन अमर योजना ऑगस्ट 2019 मध्ये आणि टेक टर्म प्लॅन सप्टेंबर 2019 मध्ये लॉन्च करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या पॉलिसींच्या प्रीमियममध्ये कोणताही बदल झालेला नाही. परंतु या काळात रिइन्शुरन्सचे दर वाढले आहे. वास्तविक रिइन्शुरन्स ही अशी प्रक्रिया आहे जेव्हा सामान्य लोकांना विमा पॉलिसी प्रदान करणारी कंपनी तिची जोखीम कमी करण्यासाठी दुसर्‍या विमा कंपनीद्वारे वितरित केलेल्या पॉलिसीचा काही भाग कव्हर करते. यामुळं जेव्हा महामारीसारख्या प्रसंगी क्लेमची संख्या अचानक अनेक पटींनी वाढते, तेव्हा कंपनीवरील जोखीम नियंत्रणात राहते. जुन्या पॉलिसीचा धारकांवर काय परिणाम होईल? ज्यांनी या दोन्ही पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना याचा कोणताही फटका बसणार नाही, त्यांची पॉलिसी पूर्वीसारखीच सुरू राहील आणि त्या आधारे फायदे मिळतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी 22 नोव्हेंबरपर्यंत आपली खरेदी पूर्ण केली आहे किंवा पॉलिसीशी संबंधित प्रस्ताव आणि पैसेही जमा केले आहेत, तसेच ज्यांचे प्रपोजल 30 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारले गेले आहेत, त्यांनाही पॉलिसी जारी केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या