नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: तुम्ही जर LIC पॉलिसीधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एलआयसीकडून त्यांच्या पॉलिसीधारकांना विविध सुविधा देण्यात येतात. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्याबाबात माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही देखील एलआयसीचे पॉलिसीधारक असाल आणि पॉलिसी प्रीमियमची माहिती तुम्हाला जर मोबाइलवर हवी असेल तर त्वरित तुमचा संपर्क क्रमांक अपडेट करा. एलआयसी त्यांच्या ग्राहकांना प्रीमियम आणि त्यासंबंधित सूचना मोबाइलवर नोटिफिकेशन अलर्टच्या (Get LIC Notification Alert) स्वरुपात पाठवते. एलआयसीकडून ही माहिती प्राप्त करण्यासाठी, ग्राहकाचे संपर्क तपशील एलआयसीकडे नोंदणीकृत (Register your contact details in LIC) असणे आवश्यक आहे. ग्राहक काही सोप्या स्टेप्स फॉलो करून त्यांचा संपर्क क्रमांक ऑनलाइन नोंदवू शकतात आणि त्यांच्या मोबाईलवर सूचना अलर्ट मिळवू शकतात. जाणून घ्या काय आहे यासाठीची प्रक्रिया.. हे वाचा- Gold-Silver Rate: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यात घसरण, चांदीचीही झळाळी उतरली अशाप्रकारे अपडेट करा संपर्क तपशील » सर्वात आधी तुम्हाला एलआयसीची वेबसाइट www.licindia.in वर जावे लागेल » त्यानंतर तुम्हाला पेजवर एक कस्टमर सर्व्हिसेसचा पर्याय दिसेल, त्यावर जाऊन स्क्रोल डाऊन करा » याठिकाणी ‘अपडेट युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाइन’ वर क्लिक करा » त्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल. तिथे ‘अपडेट युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स’वर क्लिक करा » आता ओपन झालेल्या नवीन पेजवर तुमची माहिती प्रविष्ट करा » आता तुमचा संपर्क तपशील तपासा आणि घोषणा बॉक्स तसंच सबमिटवर क्लिक करा. » पॉलिसी नंबर/नंबर्स प्रविष्ट करा हे वाचा- SEBI चा बाबा रामदेव यांना झटका, रुची सोयाकडे मागितलं स्पष्टीकरण; हे आहे कारण » आता ‘व्हॅलिडेट पॉलिसी डिटेल्स’ वर क्लिक करा आणि पॉलिसी क्रमांक प्रमाणित करा. अशा प्रकारे आपले संपर्क तपशील यशस्वीरित्या अपडेट केले जातील. आता तुम्ही फक्त काही क्लिकवर तुमचे पॉलिसी प्रीमियम ऑनलाईन भरू शकता. अशाप्रकारे ऑनलाइन तपासा स्टेटस » एलआयसी पॉलिसीचे ऑनलाइन स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी https://www.licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल. » नोंदणीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. एकदा नोंदणी केल्यानंतर, तुम्ही कधीही स्टेटस तपासू शकता. » तुम्हाला काही पॉलिसीसंदर्भात माहिती हवी असल्यास तुम्ही 022 6827 6827 वर देखील कॉल करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP लिहून संदेश पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवण्यासाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.