मुलांसाठी एलआयसीचा बेस्ट प्लान
मुंबई, 5 मार्च : तुम्हाला मुलं आहे का? तुम्ही जर एखाद्या बालकाचे पालक असाल तर तुम्हाला त्याच्या भविष्याची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत आज आपण भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या जबरदस्त योजनांविषयी माहिती घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. यासोबतच इतर अनेक फायदेही मिळू शकतात. जाणून घ्या काय आहे ही पॉलिसी आणि तुम्हाला त्याचे फायदे कसे मिळतील.
या पॉलिसीला न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन असं नाव देण्यात आलंय. ज्याद्वारे तुम्ही 10,000 रुपये टाकून तुमच्या मुलांसाठी चांगली गुंतवणूक करू शकता. लोकांचा LIC वर खूप विश्वास आहे, लोक त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे येथे गुंतवण्याला खूप सुरक्षित मानतात. प्रौढांपासून लहान मुलांपर्यंत अनेक फायदे या पॉलिसीमध्ये उपलब्ध आहेत.
बँकेकडून मिळतात 5 प्रकारचे होन लोन, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर!LIC ची नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना ही अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही 0 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पॉलिसी घेऊ शकता. यामध्ये किमान 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच, कमाल रकमेसाठी गुंतवणुकीची मर्यादा नाही. ही पॉलिसी घेणाऱ्याला 18 वर्षे, 20 वर्षे आणि 22 वर्षे वय झाल्यानंतर सम एश्योर्डच्या 20% रक्कम परत मिळते.
HDFC च्या ग्राहकांवर संकट! येताय ‘हे’ फ्रॉड मॅसेज, आता बँकेनेच दिला इशाराएलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन ही एक जीवन विमा पॉलिसी आहे. जी मुलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही योजना जीवन विमा संरक्षण, नियमित उत्पन्न आणि विशिष्ट अंतराने पैसे रिटर्नस देणे यासारखे अनेक फायदे देते. जेणेकरून गुंतवणुकीची खात्री दिली जाते आणि दुर्दैवी घटना घडल्यास मुलाच्या गरजा वेळेत पूर्ण केल्या जातात.
0 ते 12 वयोगटातील मुलासाठी कोणतेही पालक ही पॉलिसी घेऊ शकतात. अनपेक्षित घटनांच्या बाबतीत कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मुलासाठी लाइफ कव्हरचा या योजनेत समावेश आहे. ही योजना मुलाच्या सुरुवातीच्या वर्षांदरम्यान त्याच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करते. मुलाच्या शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ठराविक अंतराने पैसे परत करण्याची सुविधा या योजनेत मिळते. तुम्ही भरलेला प्रीमियम आणि मिळालेल्या मॅच्योरिटी अमाउंट दोन्हींसाठी आयकर कायद्याच्या कलम 80C आणि 10(10D) अंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकता.