JOIN US
मराठी बातम्या / मनी / LIC ने लॉन्च केली नवीन 'धन वृद्धी'पॉलिसी, कधीही करु शकता सरेंडर, जाणून घ्या डिटेल्स

LIC ने लॉन्च केली नवीन 'धन वृद्धी'पॉलिसी, कधीही करु शकता सरेंडर, जाणून घ्या डिटेल्स

LIC : भारतीय आयुर्विमा महामंडळाने ‘धन वृद्धी’ ही नवीन विमा योजना सुरू केली आहे. यात कोणकोणत्या सुविधा तुम्हाला मिळणार आहे जाणून घेऊया.

जाहिरात

एलआयसी योजना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

LIC : भारतीय आयुर्विमा महामंडळाने ‘धन वृद्धी’ ही नवीन विमा योजना सुरू केली आहे. एलआयसीने एका रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटलंय की या नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्युअल सेव्हिंग प्लानचा उद्देश विशेषतः देशांतर्गत बाजाराच्या विमा गरजा पूर्ण करणे आहे. एआयसीने त्यांच्या वेबसाइटवर माहिती दिली आहे की, ही पॉलिसी 1,000 रुपयांच्या विमा रकमेसाठी 75 रुपयांपर्यंत अतिरिक्त गॅरंटी देते. या अंतर्गत, पॉलिसीधारक कलम 80-सी अंतर्गत टॅक्स बेनिफिट्ससाठी पात्र असतील. असे म्हटले जाते की, पॉलिसीधारक पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कधीही सरेंडर करू शकतो.

पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास ही योजना कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते. ही पॉलिसी मॅच्युरिटीच्या तारखेला विमाधारकाला हमी एकरकमी रक्कम देते. कार्यकाळ आणि पात्रता ही योजना 10, 15 किंवा 18 वर्षांच्या मुदतीसाठी उपलब्ध आहे. निवडलेल्या कालावधीनुसार प्रवेशाचे किमान वय 90 दिवसांपासून ते 8 वर्षांपर्यंत असते. प्रवेशाचे कमाल वय निवडलेल्या अवधी आणि पर्यायांच्या आधारावर 32 वर्षे ते 60 वर्षांपर्यंत असते. LIC ने सांगितले की किमान मूळ विमा रक्कम रु. 1.25 लाख आहे आणि यापेक्षा जास्त रकमेचा पर्याय रु. 5,000 च्या पटीत निवडला जाऊ शकतो. LIC Policy : ‘या’ पॉलिसीमध्ये महिन्याला करा 833 रुपयांची गुंतवणूक, मिळतील कोट्यवधी! पर्याय निवडला तर एलआयसीचा अॅक्सीडेंटल डेथ आणि डिसएबिलिटी बेनिफिट्स रायडर आणि एलआयसीचा नवीन टर्म इन्शुरन्स रायडर उपलब्ध आहेत. 5 वर्षांसाठी मंथली/ क्वाटरली/ सहामाही आणि वार्षिक अंतराळात क्लेम प्राप्त करण्यासाठी मॅच्योरिटी/ मृत्यूवर सेटरमेंट पर्याय उपलब्धआहे. हा प्लान लोन सुविधेच्या माध्यमातून लिक्विडिटी प्रदान करते. जे पॉलिसी पूर्ण झाल्याच्या 3 महिन्यानंतर कधीही उपलब्ध होते. स्पेशल पुरुषांसाठी आहे LIC ची ही पॉलिसी! मिळतील जबरदस्त फायदे प्लान कसा खरेदी करावा? पॉइंट ऑफ सेल्स पर्सन-लाइफ इन्शुरन्स (POSP-LI)/कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटर्स (CPSC-SPV) यासह एजंट/इतर मध्यस्थांकडून ऑफलाइन तसेच www.licindia.in या वेबसाइटद्वारे थेट ऑनलाइन खरेदी करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या