JOIN US
मराठी बातम्या / मनी / मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन येतंय? लगेच खरेदी करा LIC ची पॉलिसी, चिंता होईल दूर

मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन येतंय? लगेच खरेदी करा LIC ची पॉलिसी, चिंता होईल दूर

LIC Jeevan Tarun Policy: आजकाल भारतात अनेक प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र बहुतांश लोक आजही पोस्ट ऑफिस किंवा LIC मध्ये गुंतवणूक करणं पसंत करतात. आज आपण एलआयसीच्या खास प्लानविषयी जाणून घेणार आहोत.

जाहिरात

मुलांसाठी एलआयसीची खास पॉलिसी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल: LIC देशातील प्रत्येक विभागासाठी विविध योजना आणते. काही योजना खास मुलांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्याची खरेदी तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी करु शकता. या योजनेचे नाव LIC जीवन तरुण पॉलिसी आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला किती रिटर्न मिळू शकतात हे पाहूया.

मुलांचे वय किती असावे

LIC च्या जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, मुलाचे किमान वय 3 महिने आणि कमाल 12 वर्षे असावे. या योजनेअंतर्गत, मूल 20 वर्षांचे होईपर्यंत एकूण गुंतवणूक केली जाते. यानंतर 5 वर्षांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागत नाही. मूल 25 वर्षांचे झाल्यानंतर, तो संपूर्ण पैसे क्लेम करु शकतो. त्यामुळे मुलाच्या शिक्षणाचा आणि लग्नाच्या खर्चाचे टेन्शन दूर होते.

LIC ची सुपरहिट पॉलिसी! फक्त चार वर्षात व्हाल करोडपती, जाणून घ्या डिटेल्स

किती मिळेल मिनिमम सम एश्योर्ड

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला किमान 75,000 रुपयांच्या सम एश्योर्डचा लाभ नक्कीच मिळेल. यासोबतच कमाल रकमेसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेअंतर्गत, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा करू शकता. जीवन तरुण पॉलिसी ही एक सहभागी मर्यादित पेमेंट योजना आहे.

प्रॉपर्टी खरेदी करताय? मग हे डॉक्यूमेंट अवश्य करा चेक, अन्यथा…

संबंधित बातम्या

मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल

एखाद्या व्यक्तीने 12 वर्षांच्या मुलासाठी ही पॉलिसी विकत घेतली आणि दररोज 150 रुपयांची छोटी रक्कम जमा केली तर वार्षिक प्रीमियम सुमारे 54,000 रुपये असेल. अशा वेळी 8 वर्षांत एकूण 4.32 लाख रुपये जमा होणार आहेत. यावर 2.47 लाख रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षी मूल सुमारे 7 लाख रुपये मिळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या