मुंबई, 25 ऑगस्ट : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणत असते. लोक त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एलआयसी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टीने एलआयसी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे लोक एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तुम्ही एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर अशी एक पॉलिसी आहे ज्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवता येतात. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करून विविध मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळतात. या पॉलिसीमध्ये प्रीमियम टर्म आणि पॉलिसी टर्म दोन्हीही सारखेच असतात. म्हणजेच, जितक्या मुदतीची तुमची पॉलिसी आहे तोपर्यंत तुम्ही प्रीमियम पेमेंट करू शकता. या पॉलिसीमध्ये महिन्याकाठी जर तुम्ही 1400 रुपये जमा केले तर तुम्हाला शेवटी 25 लाख रुपयांपर्यंत रिटर्न्स मिळतील. एका दिवसाचा हिशोब केल्यास, दिवसाला तुम्ही फक्त 47 रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपये मिळवू शकता.
Loan Apps ठरतायत मृत्यूचा सापळा! कर्ज घेताना ही खबरदारी नक्की घ्या
जर तुम्ही वयाच्या 35व्या वर्षी पुढील 35 वर्षांसाठी पाच लाख रुपयांचा इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला 16 हजार 300 रुपये वार्षिक हप्ता भरावा लागेल. सहा महिने, तीन महिने किंवा एक महिना, अशा कालावधीमध्येही तुम्हाला तुमचा प्रीमियम सेट करून घेता येऊ शकतो. 35 वर्षांमध्ये तुम्हाला एकूण पाच लाख 70 हजार रुपये जमा करावे लागतील. म्हणजे महिन्याकाठी 1400 रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 25 लाख रुपये मिळतील. यापैकी, पाच लाख रुपये ही बेसिक अश्योर्ड सम असेल तर, रिव्हिजनरी बोनस म्हणून आठ लाख 60 हजार रुपये आणि फायनल अॅडिशनल बोनस म्हणून 11 लाख 50 हजार रुपये मिळतील. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनदा बोनस मिळतो. मात्र, त्यासाठी पॉलिसी 15 वर्षे जुनी झालेली असावी. याशिवाय, जर पॉलिसी होल्डरचा (Policy Holder) मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीच्या 125 टक्के डेथ बेनिफिट (Death Benefit) मिळतो. पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर नॉमिनीला अश्योर्ड सम इतकी रक्कम दिली जाते. PPF Investment: कोट्याधीश होण्याची सरकारी स्कीम माहितीय का? आत्तापासून गुंतवणूक करा सुरू टॅक्स बेनिफिट मिळते पॉलिसीमध्ये कमीतकमी एक लाख रुपयांची रक्कम ही अश्योर्ड असते. जास्तीत जास्त अश्योर्ड समला कुठलीही मर्यादा नाही. जीवन आनंद पॉलिसीमध्ये चार रायडर्स असतात. अॅक्सिडेंटल डेथ व डिसेबिलिटी रायडर, अॅक्सिडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म अश्युरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल ईलनेस बेनिफिट रायडर इत्यादींचा त्यामध्ये समावेश होतो. यामध्ये इन्कम टॅक्स सवलतीचा लाभ घेता येतो. एलआयसीची जीवन आनंद ही पॉलिसी दीर्घकाळ चालणारी आहे. त्यामुळे तुम्ही तरुणपणात ही पॉलिसी घेऊन करिअरच्या मध्यात त्याचे रिर्टन्स मिळवू शकता.