JOIN US
मराठी बातम्या / मनी / LIC IPO मध्ये गुंतवणूक करावी की नाही? तज्ज्ञांचं मत ऐकून निर्णय घ्या फायद्याचं ठरेल

LIC IPO मध्ये गुंतवणूक करावी की नाही? तज्ज्ञांचं मत ऐकून निर्णय घ्या फायद्याचं ठरेल

LIC च्या IPO ची प्राईज बँड 902-949 रुपये आहे. या इश्यूमध्ये पॉलिसीधारक आणि गुंतवणूकदारांना इश्यू किमतीवर सूट मिळत आहे. यामुळेच किरकोळ गुंतवणूकदारांचे हित यात चांगले राहू शकते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मे : देशातील सर्वात मोठा LIC चा IPO आज उघडत आहे. LIC IPO गुंतवणूकदारांसाठी 6 दिवसांसाठी खुला असेल. कंपनीचा इश्यू 4 मे रोजी उघडत आहे आणि 9 मे रोजी बंद होईल. LIC च्या IPO ची प्राईज बँड 902-949 रुपये आहे. या इश्यूमध्ये पॉलिसीधारक आणि गुंतवणूकदारांना इश्यू किमतीवर सूट मिळत आहे. यामुळेच किरकोळ गुंतवणूकदारांचे हित यात चांगले राहू शकते. तुम्हालाही या LIC IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आधी जाणून घ्या ही गुंतवणूक योग्य आहे की नाही. मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे असोसिएट डायरेक्टर आणि फंड मॅनेजर मनीष सोंथालिया यांनी हा इश्यू आकर्षक असल्याचे सांगितले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की एलआयसीसाठी निश्चित केलेल्या मूल्यांकनामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची भीती नाही. सोंथालिया यांनी CNBC-TV18 शी बोलताना सांगितले की, सध्याच्या किमतीत, इश्यूला प्रचंड सबस्क्रिप्शन मिळू शकते. हा इश्यू गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे. LIC मधील आपली हिस्सेदारी विकून सरकार 21,000 कोटी रुपये उभे करत आहे. हा इश्यू एलआयसीच्या एम्बेडेड मूल्यांकनाच्या 1.1 पट आहे. हे पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. म्हणजे शेअर्सच्या विक्रीतून येणारा संपूर्ण पैसा सरकारकडे जाईल. Share Market: शेअर बाजारात आज तेजीची शक्यता; सेन्सेक्स 57 हजार पार जाणार? ‘हे’ घटक ठरतील महत्त्वाचे इतर अनेक विश्लेषकांनीही गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म Investmentz.com ने आपल्या अहवालात म्हटले आहे, आम्हाला विश्वास आहे की LIC ला त्याच्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कचा फायदा होईल. हाय मार्जिन नॉन-पार्टिसिपेटिंग प्रोडक्ट्स भविष्यातील वाढीमध्ये मोठी भूमिका बजावू शकतात. सद्यस्थितीत गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सोंथालिया यांनी सांगितले. सध्याच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी मंदीच्या स्थितीत त्यांचे नुकसान कमी करण्यावर भर दिला पाहिजे. New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार बर्‍याच ब्रोकरेज कंपन्यांनी सांगितले आहे की अनेक लोक प्रथमच IPO मध्ये गुंतवणूक करणार आहेत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उघडलेली डीमॅट खाती हे सूचित करते. अशा गुंतवणूकदारांनी एलआयसी इश्यूमध्ये गुंतवणूक करावी परंतु मोठ्या लिस्टिंग नफ्याची अपेक्षा करू नये. याचे कारण बाजारातील भावना कमकुवत आहे. डिस्काऊं किती मिळत आहे? सुमारे 10 टक्के इश्यू पॉलिसीधारकांसाठी राखीव आहे. त्यांना प्रति शेअर 60 रुपये सूटही मिळेल. सरकार या इश्यूमधील आपला 3.5 टक्के हिस्सा विकत आहे. याआधी त्यांनी 5 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली होती. मात्र, शेअर बाजाराची खराब स्थिती पाहता सरकारने या इश्यूची साईज कमी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या