JOIN US
मराठी बातम्या / मनी / बचत खात्यांवर कोणती बँक किती व्याज देते? एका क्लिकवर घ्या जाणून

बचत खात्यांवर कोणती बँक किती व्याज देते? एका क्लिकवर घ्या जाणून

भारतातील बहुसंख्य बँका ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या बचत खात्यांचा पर्याय उपलब्ध करुन देत असतात.

जाहिरात

सेविंग अकाउंट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी: सेविंग अकाउंट हे नवीन गुंतवणूकदारांसाठी सर्वात आवडता गुंतवणूक पर्याय आहे. पगार किंवा इतर कोणत्याही मार्गातून नियमित उत्पन्न मिळवणारे लोक हे बचत खात्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. या प्रकारच्या खात्याचे अनेक फायदे आहेत जे एखाद्याला त्यांचा बचत प्रवास सुरू करण्यात आणि कालांतराने गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करू शकतात. भारतातील बहुसंख्य बँका ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या बचत खात्यांचा पर्याय उपलब्ध करुन देत असतात. आज आपण सर्वात मोठ्या बँकांची यादी पाहणार आहोत. तसेच कोणत्या बँका किती व्याज देतात याविषयी देखील जाणून घेणार आहोत.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक विविध ग्राहकांसाठी त्याच्या निवासी स्थितीच्या आधावर बचत खाते प्रदान करत असते. बचत खात्याचे घरगुती आणि अनिवासी दोन्हीही धारक 3.50% प्रतिवर्ष ते 4.00% प्रतिवर्ष पर्यंत व्याजदर देतात. सोने खरेदी करताना फसवणूक टाळायची आहे? मग लक्षात ठेवा या गोष्टी  

एसबीआय

स्टेट बँक ऑफ इंडिया विविध ग्राहक वर्गाच्या उद्देश्याने विविध प्रकारचे बचत खाते प्रदान करते. ज्यामध्ये मूळ बचत खाते, बचत प्लस खाते, युवा बचत खाते आणि अनेक प्रकारांचा समावेश असतो. एसबीआय बचत खात्यांसाठी 2.70% प्रतिवर्ष व्याज देते. तुम्ही Rent ने राहता का? तर अवश्य जाणून घ्या तुमचे अधिकार  

सिटीबँक

भारतातील सर्वात प्रसिद्ध विदेशी बँकांमधील एक म्हणजे सिटी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे सेविंग अकाउंट्स प्रदान करते. ज्यामध्ये सिटीबँक सेविंग अकाउंट, सिटीबँक सुविधा सॅलरी अकाउंट अशा विविध अकाउंट्सचा समावेश आहे. ही बँक 2.50% प्रतिवर्ष व्याज प्रदान करते. या बचत खात्यांवरील व्याजदर, हा दररोजच्या सेविंग रकमेवर गोळा केला जातो आणि वर्षातून दोनदा जमा केला जातो.

अ‍ॅक्सिस बँक

भारतातील सर्वोच्च वित्तीय संस्थांपैकी एक अ‍ॅक्सिस बँक आहे. ही बँक ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी तयार केलेली विविध बचत खाती ऑफर करते. आपल्या सर्व बचत खात्यांवर, अॅक्सिस बँक 3.00% प्रति वर्षापासून ते 3.50% प्रति वर्षपर्यंत व्याज दर ऑफर करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या