JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमच्या मुलांचे Bank Account सुरु करण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

तुमच्या मुलांचे Bank Account सुरु करण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

बँकाही अल्पवयीन मुलांसाठी सेविंग अकाउंट्स उघडतात. हे अगदी सामान्य बचत खात्यासारखे आहे परंतु त्यावर काही मर्यादा असतात. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जानेवारी: आजच्या काळात, आर्थिक सेवा एका वयोगटापुरती मर्यादित राहिलेली नाही. अगदी अल्पवयीन व्यक्तीही आपले बँक खाते सहज ओपन करु शकतो आणि ऑपरेट करू शकतो. 2014 पासून, ही सुविधा आरबीआयने 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली आहे, त्यानंतर मुलांसाठी खाते उघडणे खूप सोपे झाले आहे. मुलांसाठी ICICI बँक यंग स्टार्स अकाउंट, स्टेट बँक ऑफ इंडिया पहला कदम आणि पहली उडान, एचडीएफसी बँक किड्स अॅडव्हांटेज आणि युनियन बँक ऑफ इंडिया युवा बँकिंग उपलब्ध आहे. पण अल्पवयीन मुलांचे खाते अकाउंट ओपन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

मुलाचे वय

बहुतांश बँकांमध्ये अल्पवयीन मुलांसाठी दोन प्रकारची खाती आहेत. एक दहा वर्षांखालील मुलांसाठी आहे आणि दुसरा 10 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. मोठी गोष्ट अशी आहे की, जर मूल 10 वर्षांपेक्षा लहान असेल तर पालकांना त्याच्यासोबत संयुक्तपणे ते अकाउंट ऑपरेट करावे लागेल.

किमान बॅलेन्स आणि बँकिंग सुविधा

बँका देखील अल्पवयीन मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवतात. बहुतांश बँकांमध्ये किमान बॅलेन्स मर्यादा रु. 2500 ते रु. 5000 पर्यंत आहे. याशिवाय या खात्यांवर सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात ज्यात चेकबुक, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम यांचा समावेश आहे.

डेबिट कार्ड

काही बँका या फोटोसह डेबिट कार्ड जारी करतात, तर काही बँका कार्डवर पालक किंवा मुलाचे नाव टाकू शकतात. खात्यावर एसएमएस अलर्ट सुविधा अलर्ट आहे की नाही याची खात्री करा, जेणेकरून व्यवहारांची माहिती त्वरित तुम्हाला मिळेल. तसेच पैसे सुरक्षितपणे कसे काढायचे हे दाखवण्यासाठी मुलाला एटीएममध्ये घेऊन जा.

खर्च मर्यादा

अल्पवयीन मुलांसाठीच्या खात्याला खर्चाची मर्यादा देखील जोडलेली आहे. हे सर्व बँकेवर अवलंबून आहे. बँकेने दिलेल्या मर्यादेनुसार तुम्हाला रु. 1000, रु. 2,500 आणि रु. 5000 ते असू शकते. तुम्ही बँकेतून एका आर्थिक वर्षात पालकांच्या संमतीशिवाय 50,000 रुपये आणि संमतीने 2 लाख रुपये काढू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या