JOIN US
मराठी बातम्या / मनी / लक्षात ठेवा 'या' गोष्टी, अन्यथा कमी होईल बाईकचे मायलेज

लक्षात ठेवा 'या' गोष्टी, अन्यथा कमी होईल बाईकचे मायलेज

सध्याच्या काळात बाइक ही जवळपास सर्वांकडेच असते. आपली बाइक चांगल्या स्थितीत राहावी यासाठी तुम्ही तिची योग्य काळजी घेत असालच. पण अनेकदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपली बाइक कमी मायलेज देते. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात

अशी घ्या बाईकची काळजी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जानेवारी: भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही कनिष्ठ मध्यमवर्गाची आहे. हे लोक आपली दैनंदिन कामे ही बाइक आणि स्कूटरने प्रवास करुन करत असतात. अशा कुटुंबांसाठी आपल्या गाडीचे मायलेज चांगले राहणे खूप गरजेचे असते. कारण पेट्रोलच्या किंमती या गगणाला भिडल्या आहेत. अशा वेळी आपले पैसे वाचवे यासाठी गाडीचे मायलेज चांगले असायला हवे. मात्र काही चुकांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे बाईकच्या कार्यक्षमतेत खूप फरक पडतो. त्यामुळे दुचाकीच्या मालकाने काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. बाईकच्या फ्यूल एफिशिएंसीवर परिणाम करणाऱ्या काही गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या वर्षी श्रीमंत व्हायचेय? मग लगेच करा या 6 गोष्टी, व्हाल मालामाल  

टायर

मोठे आणि रुंद टायर बाईकचा ड्रॅग वाढवतात आणि मायलेज कमी करतात. यामुळे टायरचा आकार छोटा असावा.

गेअर बदल

मायलेजच्या बाबतीत हा सर्वात मोठा घटक आहे. राईड दरम्यान तुम्ही जितके जास्त गीअर्स बदलाल तितके जास्त इंधन वापरले जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही मोटारसायकल पुन्हा पुन्हा हाय गियरमध्ये चालवत राहिल्यास, जास्त इंधनाचा वापर होणार नाही. त्यामुळे नेहमीच मोटारसायकल योग्य गेअरमध्ये चालवण्याचा सल्ला दिला जातो. ‘व्हॅलेंटाइन डे’साठी IRCTC ची जबरदस्त ऑफर! कमी पैशात करा बँकॉक दौरा

वजन

हेवी क्रॅश गार्ड, स्कर्टिंग गार्ड, ओव्हरसाईज हॉर्न यासारख्या अनावश्यक उपकरणांमुळे वजन वाढते आणि त्याचा परिणाम इंधनाच्या कार्यक्षमतेवर होतो. 120 किलोच्या बाईकवर 5-8 किलो वाढले तरी मायलेज कमी होण्याची शक्यता वाढते.

इंधन

नेहमी सकाळीच तुमच्या बाईकमध्ये इंधन भरा. कारण तापमान वाढले की पेट्रोलसारखे किक्विड एक्सपांड होते. त्यामुळे दुपारी पेट्रोल भरल्यास पेट्रोलचे प्रमाण कमी येईल. सकाळी पेट्रोल टाकताना जास्त इंधन मिळू शकते, कारण सकाळी तापमान कमी असते.

स्वच्छता

स्वच्छ बाइकवर कोणतेही लीकेज लगेच दिसून येते. याशिवाय बाईकच्या पार्ट्सवरील धुळीमुळे ती चालवताना समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे मायलेज कमी होण्याची शक्यता वाढते.

फ्यूलची क्वालिटी

बाइकला कोणत्या क्वालिटीच्या पेट्रोलची गरज आहे ते एकदा शोधावे. रायडरने रिक्मंडेड केलेले किंवा जास्त ऑक्टेन संख्या असलेले इंधन वापरावे. याशिवाय भरवशाच्या पेट्रोल पंपावरूनच पेट्रोल किंवा डिझेल भरून घ्या.

टँक जास्त वरपर्यंत भरु नका

काठोकाठ होईपर्यंत इंधन टँकमध्ये भरू नये. पेट्रोल भरताना किंवा बाईक चालवताना ते सांडण्याची शक्यता असतेच, पण उष्णतेने पेट्रोल पसरते आणि सांडते. रबर सील कडक झाल्यानंतर आणि तुटल्यानंतर अनेक बाइक्सच्या फिलर कॅप्स लीक होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या